
भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
#पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत आयोजित ‘आदी अष्टकम’ या आदी शंकराचार्यांच्या रचनांवर आधारित ओडिसी नृत्य सादरीकरण कार्यक्रमाला शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम ज्येष्ठ कला अभ्यासक डॉ.उषा आर.के.(मास्को ) यांनी प्रस्तुत केला .शुक्रवार,दि.१५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता) सभागृहात हा कार्यक्रम झाला.
सहाना मारिया,नम्रता मेहता,सौरव मोहंती,रसिका गुमास्ते,मधुलिता मोहपात्रा या देशभरातील नामवंत ओडीसी नृत्य कलाकारांनी आदी अष्टकम मधील अद्वैत तत्वाचे भाव नेमकेपणे सादर केले.हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा २२९ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी कलाकारांचे स्वागत आणि सत्कार केला.