
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत (Ministry of Home Affairs – MHA) देशभरातील उमेदवारांसाठी Intelligence Bureau (IB) मध्ये Assistant Central Intelligence Officer (ACIO) Grade-II/Executive पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ३ हजार ७१७ पदांसाठी ही राष्ट्रीयस्तरावरील भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, १९ जुलैपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, जी १० ऑगस्ट २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.
IB ACIO परीक्षा ही गृह मंत्रालय (MHA) द्वारे आयोजित करण्यात येणारी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे, जी Intelligence Bureau (IB) मध्ये Assistant Central Intelligence Officer (ACIO) Grade-II/Executive पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी घेतली जाते. यंदा, MHA ने IB ACIO भरती 2025 द्वारे Assistant Central Intelligence Officer, Grade-II/Executive (Group ‘C’) या पदासाठी ३ हजार ७१७ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.
IB ACIO भरती 2025 ची सविस्तर अधिसूचना www.mha.gov.in वर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही अधिसूचना ACIO Grade-II/Executive पदासाठी ३ हजार ७१७ उमेदवारांच्या भरतीसाठी प्रकाशित करण्यात आली असून, परीक्षेची संपूर्ण माहिती यात समाविष्ट आहे. हे पद General Central Service, Group ‘C’ (Non-Gazetted, Non-Ministerial) श्रेणीत येते आणि सातव्या केंद्रीय वेतन आयोगानुसार Level 7 (₹44,900 – ₹1,42,400) वेतनश्रेणीसह केंद्र सरकारच्या इतर सवलतींचाही समावेश आहे.
IB ACIO म्हणजे Intelligence Bureau Assistant Central Intelligence Officer. ACIO Grade II/Executive पदासाठीची निवड प्रक्रिया टप्पा 1 (Tier 1), टप्पा 2 (Tier 2) आणि मुलाखत (Interview) अशा विविध टप्प्यांमधून जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ₹44,900 ते ₹1,42,400 दरम्यान वेतन मिळेल.
IB ACIO ग्रेड 2/एक्झिक्युटिव्ह रिक्त जागा 2025
वित्तीय वर्ष 2025-26 साठी IB ACIO मध्ये जाहीर झालेल्या जागा ३, हजार ७१७ आहेत. या जागा विविध प्रवर्गांमध्ये (UR, SC, ST, OBC, आणि EWS) विभागल्या गेल्या आहेत. अधिसूचनेनुसार जागांची विभागणी खालीलप्रमाणे आहे:
IB ACIO Vacancies 2025
General (UR) – 1537
Scheduled Caste (SC) – 556
Schedules Tribe (ST) – 226
Other Backward Castes (OBC-NCL) – 946
Economically Weaker Section (EWS) – 442
Total – 3717
अधिकृत संकेतस्थळ: www.mha.gov.in