
गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूसासह तरुण अटक
पुणे : बिबवेवाडी पोलिसांनी गुरुवारी (दि. २६ सप्टेंबर) गस्ती दरम्यान केलेल्या कारवाईत गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूसासह एका तरुणाला रंगेहात पकडण्यात आले.
आरोपीचे नाव अतुल सुनील चव्हाण (वय २६, रा. बिबवेवाडी) असे आहे. पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे व विशाल जाधव यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, संत निरंकारी सत्संग भवनाजवळ एक संशयित तरुण पिस्तूल घेऊन थांबलेला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकून चव्हाण याला ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतल्यावर ₹५०,५०० किंमतीचे लोखंडी गावठी पिस्तूल व ₹५०० किंमतीचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अंतर्गत आरोपीला अटक करून न्यायालयाच्या आदेशानुसार येरवडा कारागृहात पाठविण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकात उपनिरीक्षक अमोल माने, अमोल भुवड, हवालदार संजय गायकवाड, अंमलदार सुमित ताकपेरे, विशाल जाधव यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी केली.



