स्वतंत्र पोलीस ठाणे झाल्याने व सध्याची जागा पालखी मार्गाच्या रस्त्याला जाणार असल्याने नागरिकांची उरुळी देवाची येथील जागेची मागणी
पुणे : हडपसर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील फुरसुंगी पोलीस चौकी व लोणी काळभोर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील ऊरळी देवाची पोलीस चौकी असे दोन्ही चौक्या एकत्र करुन नागरीकांच्या सोयीचे दृष्टीने शासनाने फुरसुंगी पोलीस ठाणेची निर्मीती केलेली आहे. परंतु सदरील जागा अतिशय छोटी असल्याने व पुणे पंढरपूर पालखी मार्गात जात असल्याने उरुळी देवाची येथील जिल्हा परिषदेच्या दवाखान्याची जागा द्यावी अशी मागणी वंचित आघाडीचे नेते माजी उपसरपंच व शांतता कमिटी सदस्य अतुल बहुले यांनी केली आहे.
हा दवाखाना जिल्हा परिषद च्या कार्यकाळात चालत होता आता गावात महापालिकेचा दवाखाना आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या जागेचा वापर पोलीस ठाण्यासाठी झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल. फुरसुंगी, ढमाळवाडी, ऊरळी देवाची, वडकी, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी भागातील नागरीकांच्या सोयीसाठी शासनाने नवीन पोलीस ठाणेची निर्मीती केलेली आहे. सद्या फुरसुंगी पोलीस ठाणे हे पुर्वी चालु असलेल्या ऊरळी देवाची चौकीतच चालु करण्यात आलेले आहे. पोलीस ठाणेस वेगवेगळे विभाग असुन त्याद्वारे कामकाज पाहीले जाते. पोलीस ठाणेस वरील भागातील नागरीक तक्रारीसाठी, पासपोर्ट, पोलीस व्हेरीफिकेशन, इतर परवानग्या तसेच इतर कामासाठी आल्यांनंतर त्यांना सर्व सुविधा पुरविणे शक्य होत नाही. पोलीस ठाणेकडील अधिकारी/अंमलदार तसेच सर्व विभागाचे पोलीस अंमलदारांना जागेअभावी एकाच रुममध्ये कामकाज करावे लागत आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व मिळकती या उरुळी देवाची फुरसुंगी नगरपरिषदेस पुणे मनपा ने यापुर्वीच हस्तांतरित केल्या आहेत.
पोलीस ठाणेकडील दैनंदीन कामकाज करण्यासाठी जागेची कमरता आहे. त्यामुळे नागरीकांना बैठकीची व्यवस्था करणे ही शक्य होत नाही. फुरसुंगी, ढमाळवाडी, ऊरळी देवाची, वडकी, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी भागातील नागरीकांच्या सोयीसाठी शासनाने धोरण ठेवुन नवीन पोलीस ठाणेची निर्मीती केलेली असुन शासनाचा १०० कलमी कृती आराखडा हा नवीन उपक्रम राबविला जात आहे. नागरीकांना विहीत मुदतीत सर्व सुविधा पुरविणे हे महाराष्ट्र शासनाचे अतिशय महत्वाचे धोरण आहे.
तसेच मिटींगसाठी पुरेसी जागा उपलब्ध नाही . पोलास स्टेशन मध्ये कामासाठी येणाऱ्या अभ्यांगतांना , तक्रारदारांना बसण्याची सोय नाही. रस्त्यावर उभे रहावे लागते , पार्किंग नाही रस्त्यावर गाड्या उभ्या कराव्या लागतात अपघात होण्याची शक्यता आहे . त्यामुळे लवकरात लवकर उरुळी देवाची येथील जिल्हा परिषदेची वापराविना असलेली इमारत पोलीस ठाण्यास द्यावी अशी आग्रही मागणी उरुळी देवाची फुरसुंगी नगरोरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अतुल बहुले यांनी केली आहे.