शेअर मार्केट फसवणुकीत दोघांना अटक
सायबर चोरट्यांना बँक खाते देत होते वापरण्यास, १ कोटी १५ लाखांचे व्यवहार, देशभरातून १० तक्रारी
पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास ८ ते २५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एका अकाऊटंटला ६३ लाख ९३ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला़. याप्रकरणात सायबर चोरट्यांना बँक खाते वापरण्यास देणार्या दोघांना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे मातोश्री पॅथोलॉजी लॅबोटरी नावाने बँकेत खाते आहे. या खात्यात त्यांनी आतापर्यंत १ कोटी १५ लाख ८५ हजार ७८९ रुपयांचे व्यवहार झाले असून या बँक खात्याविरुद्ध विविध राज्यातील फसवणुकीच्या १० तक्रारी मिळाल्या आहेत.
प्रथमेश शिवाजी भुसे (वय २३, रा. अहिल्यानगर, सध्या रा. लेक व्हिव सिटी, लोहगाव) व त्याचा साथीदार सचिन राधाकिसन मोरे (वय ३४, रा. हिंदवी स्वराज्य कॉलनी, आदर्शनगर, दिघी) असे अटक केलेल्यांचे नाव आहे.
फिर्यादी हे एका खासगी कंपनीत अकाऊटंट आहेत. ते फेसबुक पहात असताना त्यांना शेअर मार्केटची जाहीरात दिसली. त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर त्यांना व्हॉटसअॅपच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये अॅड केले गेले. त्यांना वेगवेगळ्या शेअरमध्ये पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यांनी ६३ लाख ९३ हजार ५०० रुपये गुंतवले. त्यांच्या रक्कमेवर ७ कोटी ५६ लाख ९१ हजार ४६० रुपये दिसत होते. त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना आणखी पैसे भरायला सांगितले जात होते.
याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासामध्ये फसवणुकीच्या रक्कमेपैकी ८ लाख ५० हजार रुपये हे अॅक्सीस बँकेच्या एका खात्यात गेल्याचे दिसून आले. मातोश्री पॅथोलॉजी लॅबोरटी या नावाने हे खाते होते. त्याची केवायसी प्रथमेश भुसे याच्या नावाने होती. पोलिसांनी प्रथमेश भुसे व सचिन मोरे यांना अटक केली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहित डोळस, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील, पोलीस अंमलदार दीपक भोसले, विनायक म्हसकर, हेमंत खरात, कृष्णा गवळी, श्रीकांत कबुले, अभिजित उकिरडे, अतुल लोखंडे, माधव आरोटे, सोपान बोधवड, संतोष सपकाळ, दिपाली चव्हाण यांनी केली आहे.