रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या डोक्यात दगड घालून खुन करणारे तिघे जेरबंद
आईवरुन शिवीगाळ केल्यावरुन झाली होती बाचाबाची, वाघोलीतील घटना
वाघोली परिसरातील घटना, वाघोली पोलिसांनी दीड दिवसात गुन्हेगारांना केली अटक
पुणे : गप्पा मारत असताना आईवरुन शिवीगाळ करण्यावरुन झालेल्या वादावादीत रेकॉर्डवरील गुन्हेगार मित्राच्या डोक्यात दगड घालून खुन करणार्या तिघांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे.
अक्षय बाबू पटेल (वय २४), प्रदीप रघुनाथ जाधव (वय २३, दोघे रा. आपले घर सोसायटी, खराडी), मयूर रामकिसन वडमारे (वय २२, रा. खुळेवाडी, चंदननगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बादल शेख (वय २०, रा. चंदननगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. ही घटना वाघोलीतील उबाळेनगर येथील कृष्णा लॉजच्या पार्किगमध्ये ५ ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा चार वाजता घडला होता.
याबाबत कृष्णा लॉजचा सिक्युरिटी राम गजमल यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हे बादल शेखचे मित्र आहेत. बादल शेख याच्याविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात बेकायदा जमाव जमवून मारामारी केल्याचा गुन्हा दाखल होता.
मुख्य आरोपी अक्षय पटेल याच्यावर २०२४ मध्ये विमानतळ पोलीस ठाण्यात दरोड्याचे २ गुन्हे दाखल आहेत. अक्षय पटेल याच्यावर २०२२ मध्ये चंदननगर पोलीस ठाण्यात वाईल्ड लाईफ प्रोटेक्शनचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.
रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बादल शेख व त्याचे तीन मित्र हे कृष्णा लॉजमध्ये आले होते. त्यांनी २ तासासाठी रुम पाहिजे असे सांगितले. त्यावर त्यांनी १२०० रुपये भाडे सांगितले. तेव्हा त्यांनी आम्ही थोडा वेळ इथेच गप्पा मारत थांबतो, असे म्हणाले. फिर्यादी हे मोबाईल पहात होते. ते पार्किंगमध्ये गप्पा मारत होते. सुमारे सव्वा तासानंतर त्यांच्यामध्ये मोठमोठ्या शिवीगाळ सुरु झाली. बादल शेख हा मयुर वडमारे याला ‘‘आईवरुन शिवीगाळ करु नको, आई सर्वात मोठी आहे. तिच्यापुढे दोस्तीबिस्ती काही नाही,’’ असे म्हणाला. तेव्हा त्यांच्या बाचाबाची झाली. मयुर याने बादल याला ढकलले. तो खाली पडला. तिघांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर तो उठून पळू लागला. पळताना काही अंतरावर जाऊन खाली पडला. अक्षय पटेल याने त्याच्याकडील हत्याराने डोक्यात वार केला. त्यानंतर अक्षय पटेल याने मोठा दगड बादलच्या डोक्यात घातला. तेथील दगड घेऊन तो पुन्हा पुन्हा डोक्यात मारत होता. तो मरुन पडल्यावर ते अहिल्यानगरकडे पळून गेले.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अंमलदार प्रदिप मोटे यांना आरोपी खराडी, दापोडी येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरुन तेथे सापळा रचून अक्षय पटेल, मयुर वडमारे, प्रदीप जाधव यांना अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दीपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनीनाथ बोयणे यांनी केली आहे.