
मुंबई : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या रात्री भीषण हल्ला झाला. त्याच्या घरात शिरलेल्या हल्लेखोराने सहा वार केले. विजय दास, बिजॉय दास या नावाने तो मुंबईत वास्तव्य करत होता. सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर हा मूळ बांगलादेशी आहे. मोहम्मद इलियास असं त्याचं नाव अशी माहिती डीसीपी दीक्षित गेडाम यांनी दिली. दरम्यान सैफ अली खानवर हल्ला करणारा मोहम्मद हा हाऊस किपिंग एजन्सीमध्ये काम करत होता आणि सैफ अली खानच्या घरी तो येऊन गेला होता अशीही माहिती समोर आली आहे.
अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी अखेर पकडला आहे. त्याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील जंगलातील झुडूपांमध्ये तो लपला होता. अंगावर झाडाच्या फांद्या आणि पाला ओढून तो लपला होता. पण पोलिसांना टिप मिळताच मध्यरात्री कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. शरीफुल इस्लाम शहजाद असं या आरोपीचं नाव आहे. तो मूळचा बांगलादेशचा आहे. मुंबईत आल्यावर त्याने त्याचं नाव विजय दास असं ठेवलं होतं. पोलिसांनी सांगितले आहे.
आरोपी बांगलादेशमधून आला आहे. त्यामुळे आवश्यक ती सगळी कलमं आम्ही लावली आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही चौकशी करतो आहोत. आरोपीला अटक झाल्यानंतर चौकशीसाठी कमी वेळ मिळाला आहे. इतर गोष्टी चौकशीत पुढे येतील. आरोपी बांगलादेशी असल्याचा प्राथमिक पुरावा मिळाला आहे. त्याच्याकडे कुठलंही भारतीय प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र नाही. भारतात आल्यानंतर त्याने त्याचं नाव बदललं. भारतात विजय दास या नावाने तो राहात होता. आरोपी साधारण सहा महिन्यांपूर्वी भारतात आला. मुंबईत काही महिने तो राहिला. त्यानंतर उपनगरांमध्ये राहिला आणि १५ दिवसांपूर्वी परत मुंबईत आला होता. हाऊस किपिंग एजन्सीमध्ये तो काम करत होता अशीही माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद असं आरोपीचं नाव त्याचं वय 30 वर्ष आहे. चोरीच्या उद्देशाने आरोपीने घरात प्रवेश केल्याचं आतापर्यंत झालेल्या तपासातून समोर येत आहे. आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार असून पोलीस कस्टडीसाठी मागणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर पुढील चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुंबई पोलिसांनी सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला ठाण्यातून अटक केली आहे. ठाण्यातील कासारवडवली भागातून मध्यरात्री ३ च्या सुमारास ही अटक करण्यात आली आहे. आरोपी विजय दास ऊर्फ मोहम्मद शेखला ठाण्याच्या लेबर कॅम्पजवळील जंगलातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तब्बल २०० जण असलेल्या पोलिसांच्या पथकाने सापळा रचत मुख्य आरोपीला अटक केली आहे. यानंतर त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्याने एक-दोन नव्हे तर चार नावे सांगितली आहेत.







