
नपुसंक मुलाकडून संतती होत नसल्याने सासऱ्याने दिली सुनेला ऑफर
पुणे : लैंगिक क्षमता नसलेल्या मुलाचे लग्न लावल्यानंतर सुनेला त्रास देऊन संततीसाठी सासऱ्याने सुनेला शारीरिक संबन्ध ठेवण्यासाठी बळजबरी केली. तसेच, तिच्या बेडरूममध्ये घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा नराधम सासरा पोलीस दलामधून सेवानिवृत्त झालेला सहायक पोलीस आयुक्त आहे.
सहकारनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी ३५ वर्षीय पती, ५६ वर्षीय सासू आणि ६१ वर्षीय सासऱ्यावर भान्यासं ७४, ७५, ७९, ८५, ३५२, ३५१(२), ११५ (२), ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार ५ जून २०२५ ते २३ जून २०२५ या कालावधीदरम्यान घडला. आरोपींनी फिर्यादी व तिच्या आईवडिलांची फसवणूक केली. मुलगा लैंगिक क्षमतांच्या बाबतीत दुबळा असून त्याच्यामध्ये संतती जन्माला घालण्याची क्षमता नाही ही गोष्ट लपवून ठेवण्यात आली.
फिर्यादी व त्यांच्या आई वडीलांची फसवणुक करुन दोघांचे लग्न करुन देण्यात आले. फिर्यादीचा आरोपी पती मुल जन्माला घालण्यास सक्षम नसल्याने फिर्यादीने तिच्या सासऱ्यासोबत शारीरिक संबध ठेवून मुल जन्माला घालण्याची तिच्यावर सक्ती करण्यात आली. पती व सासूने याबाबत जबरदस्ती करुन शारिरीक व मानसिक त्रास दिला. फिर्यादी एकट्या घरामध्ये असताना सासरे बळजबरी तिच्या खोलीमध्ये घुसले. त्याने पदाची व ओळखीची तिला भिती दाखविली.
शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी करुन बळजबरी हात धरुन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसे न केल्यास मारुन टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.




