अमेरिकन नागरिकांची फसवणुक करणार्या कॉल सेंटरवर छापा
मालवेअरची भिती दाखवून घालत होते गंडा, १६ लाखांचा माल जप्त, ३४ जणांवर गुन्हा दाखलपुणे : अमेरिकन ज्येष्ठ नागरिकांना मालवेअरची भिती दाखवून त्यांच्या माहितीचा डाटा चोरीला जाईल, असे सांगून अॅन्टीव्हायरस घेण्यास भाग पाडून फसवणुक करणार्या कॉल सेंटरवर गुन्हा शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने छापा टाकला.
हडपसर येथील मगरपट्टा रोडवरील सिजन मॉलजवळील मार्वल फिगो बिल्डिंगमधील ४ थ्या मजल्यावर हे कॉलसेंटर चालविले जात होते. तेथून १५ लाख ७६ हजार ९०० रुपयांचे २९ लॅपटॉप, २० संगणक, ४१ मोबाइल, राऊटर, अन्य साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कॉल सेंटरचे चालक मालक निर्मल अजय शहा (वय ३८, रा. कुमार पिकासो सोसायटी, हडपसर), अतुल प्रविणभाई श्रीमाळी (वय ३०, रा. लेबरनम पार्क सोसायटी, मगरपट्टा, हडपसर), युगंधर संजय हादगे याना व २९ कामगारांना ताब्यात घेण्यात आले असून दोघांचा शोध सुरु आहे. त्यातील युगंधर संजय हादगे (वय ३४, रा़ शोभा निवास, शिवकृष्ण सोसायटी, मांजरी) याला अटक केली आहे.
या कॉल सेंटरमध्ये काम करणारे हे प्रामुख्याने गुजरात, आसाम, नागालँड, मणीपूर, उत्तर प्रदेश, पंजाब, मुंबई, ठाणे येथील असून एक जण नायजेरिया येथील राहणारा आहे.
याबाबत पोलीस अंमलदार अजित दत्तात्रय कांबळे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हडपसरमधील एका व्यावसायिक संकुलात बेकायदा कॉल सेंटर चालविले जात होते. या कॉल सेंटरमधील कर्मचारी अमेरिकन ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या मोबाइल फोन, लॅपटॉप, संगणक यावर मालवेअर टाकण्यात येत होता. त्यांना कॉल करुन मालवेअरची भिती घालून त्यांच्या फोन, संगणकामधील माहिती तसेच त्यांचे बँक खात्याची डिटेल्स व क्रेडिट कार्डचे डिटेल्स चोरीला जाण्याची भिती दाखविली जात होती. वेगवेगळ्या प्रकारचे अॅन्टी व्हायरस, प्रोटेक्शन अॅप तसेच सेटिंग सांगून नागरिकांकडून क्रिप्टो करन्सी हे त्यांच्या बायनान्स (ट्रस्ट वॉलेट) वर स्वीकारुन त्यांची आर्थिक फसवणुक करण्यात येत होती. या सर्व परदेशी लोकांचा डाटा हा सिनीयर सिटीजन पोर्टल वॉशिग्टन डी सी व सोशल सिक्युरिटी डाटा यु एस यातून हे कामगार प्राप्त करत होते.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, छबू बेरड, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खरात, संतोष तानवडे, अभिजित पवार, पोलीस अंमलदार राजस शेख, प्रशांत कर्णवर, तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, शहाजी काळे, प्रताप गायकवाड, अमर चव्हाण, पृथ्वीराज पांडुळे, विनोद शिवले, विनोद निंभोर, शशिकांत नाळे, पल्लवी मोरे, स्वाती तुपे, अमित कांबळे, उमाकांत स्वामी, अकबर शेख, गणेश माने, परमेश्वर कदम, राजेश लोखंडे, कैलास चव्हाण, संतोष होले, गणेश गोसावी, दत्तात्रय खरपुडे, सुनिल महाडिक यांनी केली आहे.