
मुरलीधर मोहोळ : केंद्रीय रेल्वे आणि सूचना-प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सविस्तर चर्चा
#पुणे : पुणे आणि पुण्याशी संबंधित विविध विषयांसंदर्भात नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे आणि सूचना-प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेत सविस्तर चर्चा केली.
बैठकीत कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
१. पुणे आकाशवाणीचे प्रसारण मुंबईऐवजी पुणे केंद्रावरूनच व्हावे आणि पुण्यासाठी ‘रेन्बो’ रेडिओ चॅनेल सुरु करावे.
२. पुणे आकाशवाणीत अद्ययावत सामग्री उपलब्ध व्हावी आणि कार्यक्रम विभागातील रिक्त जागा तातडीने भराव्यात.
३. पुणे-दिल्ली दरम्यान ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ सुरु व्हावी.
४. पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, पुणे-कोल्हापूर या दरम्यान ‘वंदे भारत’ तरतूद व्हावी.
५. पुणे दूरदर्शन केंद्र अद्ययावत व्हावे.
६. पुणे ते जोधपुर (राजस्थान) दरम्यान सुरु असलेल्या रेल्वे फेऱ्यांची संख्या वाढावी.
या चर्चेअंती मंत्री वैष्णव यांनी संबंधित विषयांच्या पूर्ततेसाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच, मोहोळ यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सहप्रभारी म्हणून यशस्वीपणे जबाबदारी निभावल्याबद्दल वैष्णव यांचे अभिनंदन केले.