
धार्मिक प्रार्थनेच्या नावाखाली फसवणूक व धर्मांतरणाचा आरोप; भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धार्मिक प्रार्थनेच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल करून धर्मांतरणाचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, याप्रकरणी संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मॅक्सीन एंटनी थेक्केलियील (वय ४७, रा. शिंगणापुर, सासवड), सजी जॉर्ज (वय ४८, रा. संकला एन्क्लेव्ह, धर्मावत पेट्रोलपंप जवळ, पिसोळी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी निखिल बळवंत पालकर (वय 36, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींवर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांची समुळ उच्चाटन करणेबाबत अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
धनकवडी येथील आर क्यूब हॉलमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आरोपी मॅक्सीन याने मी प्रार्थना केल्याने लोकांचे कॅन्सर, टी.बी सारखे आजार बरे झाले असल्याची बतावणी केली. तसेच, हॉलमध्ये जमलेल्या लोकांपैकी दोन लोकांना पुढे बोलावण्यात आले. यातील एकाने मी एकेकाळी भिकारी होतो, येशुची प्रार्थना केल्याने मी श्रीमंत झालो असल्याचे सांगितले. तर, दुसऱ्या व्यक्तीने माझी आई आजारी होती, धर्मगुरुंनी प्रार्थना केल्यामुळे माझ्या आईचा आजार बरा झाला असल्याची बतावणी केली.
या व्यक्तींनी स्वतःला ख्रिश्चन धर्मीय प्रार्थना करणारे असल्याचे सांगत “येशूची प्रार्थना केल्याने कॅन्सर, टीबीसारखे आजार बरे होतात” तसेच आर्थिक परिस्थिती सुधारते असे आमिष दाखवले. या प्रार्थनांच्या माध्यमातून लोकांना सभास्थळी बोलावून त्यांच्यावर मानसिक प्रभाव टाकण्यात आला, असा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, या प्रार्थनांच्या वेळी उपस्थित लोकांसमोर अन्य धर्मांविषयी अपमानास्पद विधाने करण्यात आली आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास आयुष्यात चमत्कारिक बदल होतील, असे सांगण्यात आले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. संबंधित कार्यक्रम, सभास्थळ, उपस्थित व्यक्ती आणि वापरलेल्या माध्यमांची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
#PuneNews, #पुणे, #BreakingNews, #MaharashtraNews, #CrimeNews, #धर्मांतरण, #धार्मिकफसवणूक, #धर्माच्या_नावाखाली, #जादुटोणा, #ReligiousFraud, #PoliceAction, #BharatiVidyapeethPolice, #LawAndOrder, #CrimeInPune, #ViralNews, #TrendingNews, #PublicAlert, #SocialAwareness, #TruthExposed







