युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांची आहे कंपनी
#पुणे : बारामती येथील शरयू मोटर्स या कार शोरूममध्ये पोलिसांनी सोमवारी रात्री सर्च ऑपरेशन केल्याची माहिती समोर आली आहे. शरयू मोटर्स ही अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तपासणीकडे लक्ष लागले आहे. बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या जंगी सभा झाल्या. या दोन्ही सभांमधून आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न झाला. बारामतीकर नेमके कोणाच्या पाठीमागे जाणार हे निकालांती स्पष्ट होईल? दरम्यान, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यासोबतच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेले आहेत. शरयू मोटर्समध्ये पोलिसांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबतीतले तपशील अद्याप हाती आलेले नाहीत. ही तपासणी नेमकी कशामुळे करण्यात आली याचे देखील उत्तर अद्याप प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही. मात्र, या तपासणीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, या तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळून आले नसल्याचे पोलिसानी माध्यमांना सांगितले.








