
माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर आणि इतर सहा जण ताब्यात
पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील खराडी परिसरातील एका स्टुडिओ फ्लॅटमध्ये रविवारी पहाटे सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकून कोकेन, गांजा, हुक्का आणि मद्य जप्त केले. या कारवाईत माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर आणि अन्य सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये दोन महिला आणि निखिल पोपट या बुकीचा देखील समावेश आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “गुन्हे शाखेला खराडी परिसरातील एका स्टुडिओ फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती मिळाली. कारवाईदरम्यान कोकेन, गांजा, हुक्का आणि मोठ्या प्रमाणात मद्याच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. सर्व सात जणांना अटक करण्यात आली असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.”
प्रांजल खेवलकर आणि इतरांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर पुण्यातील हडपसरमधील त्यांच्या बंगल्यावर छापा टाकण्यात आला. जेथे एक लॅपटॉप, तीन पेन ड्राईव्ह आणि एक हार्ड डिस्क जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर खेवलकर यांना पुणे पोलीस आयुक्तालयात पुढील चौकशीसाठी नेण्यात आले असून, त्यांना रविवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रांजल खेवलकर हे माजी भाजप नेते आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)मध्ये असलेल्या एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. त्यामुळे या कारवाईबाबत राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरु असून, अमली पदार्थांचा वापर करणाऱ्या उच्चभ्रू मंडळींवरील कारवाईचा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी काय काय केले जप्त?
. उच्च दर्जाचे कोकेन आणि गांजा
. हुक्क्याचे सेट्स
. मोठ्या प्रमाणात मद्याच्या बाटल्या
. लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क
#PuneRaveParty
#DrugBustPune
#EknathKhadse
#PranjalKhewalkar
#HighProfileRaid
#CocaineParty
#NarcoticsSeized
#PuneCrimeNews
#RaveRaid
#DrugFreeIndia
#पुणेरेव्हपार्टी
#ड्रग्जकारवाई
#प्रांजलखेवलकर
#एकनाथखडसे
#रेव्हपार्टीछापा
#गांजाकोकेन
#पोलिसछापा
#हडपसरघटना
#खराडीघटना
#पुणेगुन्हे