
NECC & Vencobb प्रस्तुत कर्तव्य रत्न पुरस्कार 2025
पुणे : समर्पण, चिकाटी आणि निस्वार्थ सेवेचा सोहळा साजरा करत पुणे शहराने गौरवशाली ऐतिहासिक प्रसंग अनुभवला. NECC & VENCOBB प्रस्तुत कर्तव्य रत्न पुरस्कार 2025 हा सोहळा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलामंदिर येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने घेण्यात आला. शहरातील असंख्य निस्वार्थ नायक असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांचा आणि योगदानाचा गौरव करण्यासाठी ही एक अद्वितीय संधी साधण्यात आली.
या उपक्रमाची संकल्पना Prisma Media & Entertainment LLP चे राकेश मल्होत्रा आणि Merakianz Media House चे श्रुती बेंग्रे यांची होती. तर MIT-ADT University, Suhana आणि Lokmanya Multipurpose Co-operative Society Ltd. यांचे सहकार्य या उपक्रमासाठी लाभले. सामुदायिक चित्रपट भागीदार म्हणून अवकारिका यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात शर्वरी जमेनीस यांनी सादर केलेल्या भावपूर्ण गणेश वंदनेने झाली. यावेळी भक्तिमय आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे बी. के. सिंग (रोडवेज सोल्यूशन्स प्रा. लि.) आणि नौशाद शेख (व्हेलॉसिटी कन्सल्टन्सी) यांनी केले. बी. के. सिंग यांचा प्रेरणादायी भाषणाने सर्वांच्यांच हृदयाला स्पर्श केला. यावेळी प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
यावेळी माजी अतिरिक्त आयुक्त, ज्ञानेश्वर मोळक यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यांनी पुण्याच्या प्रगतीसाठी राबविलेल्या नवकल्पनांबाबत सांगितले, जसे की मासिक मेगा मिटिंग्स, संरचित स्वच्छता सर्वेक्षण आढावे, मोहल्ला व अपेक्स समित्यांची स्थापना, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष फील्ड कर्मचाऱ्यांशी संवाद याविषयी माहिती दिली. मोळक यांनी माणुसकी, संवाद, आणि सहानुभूतीचे महत्त्व अधोरेखित केले, तसेच सर्व महापालिका कर्मचाऱ्यांचे, त्यांच्या कुटुंबियांचे आणि सहकाऱ्यांचे योगदान अधोरेखित केले. त्यांनी नागरिकांना सर्व सफाई कामगारांचा आदर करावा, त्यांना हसत-हसत अभिवादन करावे आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घ्यावी अशी मनापासून विनंती केली.
कार्यक्रमात महादेव जाधव यांचाही विशेष उल्लेख करण्यात आला. ते महापालिकेच्या स्वच्छ अभियानाचे ब्रँड अॅम्बॅस्डर आहेत. गीत गायन करून जनजागृती करतात. त्यांचा समर्पणामुळे सर्वांनी उभ्या राहून त्यांचा अभिवादन केले.
कार्यक्रमाला एक जादुई अनुभव देण्यासाठी, जादूटोणा सादर करणारे अमित कलंतरी यांनी सर्वांचे लक्ष वेधले. त्यांच्या अद्भुत सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. कर्तव्य रत्न पुरस्कार 2025 हे अशा व्यक्तींना गौरविते जे त्यांच्या कर्तव्यातून पुढे जाऊन, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि निस्वार्थतेची प्रतिकृती आहेत. या वर्षी, स्वच्छता, आरोग्य निरीक्षण, अभियांत्रिकी आणि प्रशासन या क्षेत्रातील 30 उत्कृष्ठ कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांची यादी:
ज्ञानेश्वर मोलक (माजी अतिरिक्त आयुक्त, PMC), महादेव जाधव (माजी सफाई सेवक व PMC ब्रँड अॅम्बॅस्डर), इम्मामुद्दिन इनामदार (मुख्य आरोग्य निरीक्षक), आशिष कोळगे (उपअभियंता – यांत्रिकी), कमलेश शेवते (उपअभियंता), महेंद्र सावंत (वरिष्ठ आरोग्य निरीक्षक), राहुल राजगोळकर (वरिष्ठ आरोग्य निरीक्षक), नवनाथ शेलार (आरोग्य निरीक्षक), सुषमा मुंडे (आरोग्य निरीक्षक), प्रदीपकुमार राऊत (आरोग्य निरीक्षक), प्रीती भांडगे (आरोग्य निरीक्षक), किरण मांडेकर (आरोग्य निरीक्षक), राहत कोकणी (स्वच्छता निरीक्षक), चेतन राजेंद्र धडे (सफाई सेवक), संतोष शांताराम उमापे (सफाई सेवक), नागेश चावतमहाल (सफाई सेवक), कमलाकर मल्हारी सुर्यवंशी (सफाई सेवक), अनिल रमेश भगवणे (सफाई सेवक), गोपाळ कबीर अडसूळ (मुकादम), विलास रामचंद्र थोरात (सफाई सेवक), कैलास विश्वनाथ डोलारे (सफाई सेवक), राजश्री फासगे (सफाई सेवक), भीमराव क्रांती (JCB ऑपरेटर), वैजनाथ गायकवाड (मुकादम), नरेंद्र दीक्षित (मुकादम), दत्तात्रय जगताप (सफाई सेवक), बायडा गायकवाड (स्वच्छ सेवा संस्था), समीना सलीम मुलानी (स्वच्छ सेवा संस्था), अवंता शेंडगे (स्वच्छ सेवा संस्था), किरण थोरात (स्वच्छ सेवा संस्था).
कार्यक्रमातील आणखी एक ठळक गोष्ट म्हणजे अवकारिका. एक सामुदायिक चित्रपट सादरीकरण, ज्याने पुण्याच्या नागरिक सेवकांच्या संघर्ष, अभिमान आणि मानवीयतेची कथा भावनिकरित्या सादर केली.
कार्यक्रमास अनेक प्रसिद्ध अभिनेते उपस्थित होते. यामध्ये पुष्कर जोग, मुग्धा गोसवे, पूजा चोप्रा, स्मिता गोंडकर, पल्लवी पाटील, शिव चोरडिया, आणि रेशम टिपणीस यांचा समावेश आहे. ज्यांनी पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. कर्तव्य रत्न पुरस्कार 2025 हा केवळ एक पुरस्कार नाही, तर सामाजिक सेवा आणि सार्वजनिक कामाला मानवतेने गौरवण्याचा उपक्रम आहे.
प्रकाशन करणारे:
कर्तव्य रत्न पुरस्कार समिती, पुणे महानगरपालिका सहकार्याने
सादरकर्ते: NECC & Vencobb
सहकार्यक प्रायोजक: MIT-ADT University, MIT-ADT University, Suhana and Lokmanya Multipurpose Co-operative Society Ltd.
सामुदायिक चित्रपट भागीदार: अवकारिका
कार्यक्रम आयोजक: Merakianz Media House
संकल्पना: Prisma Media & Entertainment LLP