
भारताच्या एआय ऊर्जाप्राप्त सायबर गुन्ह्याच्या लढ्यात महाराष्ट्राचे नेतृत्व
मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या स्पेशल पर्पज व्हेईकल मार्व्हल आणि मायक्रोसॉफ्ट इंडिया डेव्हलपमेंट सेंटरसोबत (आयडीसी), सायबर आय, सायबर सिक्युरिटी आणि आयओटीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानातील नवसंशोधक आणि मायक्रोसॉफ्टच्या भागीदार आयएसव्हीने विकसित केलेले महाक्राइमओएस एआय या एका आघाडीच्या, एआय आणि अझ्युर पॉवर्ड प्लॅटफॉर्मचे आज मुंबईत मायक्रोसॉफ्ट एआय टूरमध्ये अनावरण करण्यात आले. ही घोषणा मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ सत्या नाडेला यांनी केली. त्यांनी राज्यातील डिजिटल सुरक्षितता आणि एआयवर आधारित प्रशासनाच्या भविष्याबद्दल चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सध्या नागपूरमधील २३ पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या महाक्राइमओएस एआयला मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली आणि महाराष्ट्रातील सर्व १,१०० पोलिस ठाण्यांमध्ये भविष्यातील विस्तार प्रस्तावित केला.
महाराष्ट्र शासन आणि त्यांच्या मार्व्हल उपक्रमाच्या सहकार्याने मायक्रोसॉफ्ट दिवसेंदिवस जटिल आणि विकसित होणाऱ्या सायबर गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी पुढील पिढीच्या एआयचा वापर करत असून सायबर गुन्ह्यांविरुद्धच्या भारताच्या लढाईला वेगाने पुढे नेत आहे. महत्त्वाचे म्हणजे महाक्राइमओएस एआयची रचना अधिकाऱ्यांना एआय साधनांनी सक्षम करण्यासाठी केली आहे जेणेकरून ते प्रकरणे जलद आणि अधिक कार्यक्षमतेने सोडवू शकतील व मानवी कौशल्य आणि जबाबदार नवसंशोधनाची सांगड घालतील. राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलनुसार २०२४ मध्ये देशात ३.६ दशलक्षाहून अधिक घटना नोंदवल्या गेल्या आहेत आणि सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे हा उपक्रम कायद्याच्या अंमलबजावणीला सायबर गुन्ह्यांच्या तपासांना गती देण्यासाठी सक्षम करतो आणि भारतात डिजिटल सुरक्षिततेसाठी एक नवीन मानक स्थापित करतो.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले: “जनहितासाठी नैतिक आणि जबाबदार एआय हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. एआयमध्ये कार्यक्षमता सुधारण्याची, जीवनमान वाढवण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकासाठी खऱ्या अर्थाने जगणे सुलभ करून परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती आहे. मार्व्हलच्या रचनेमागील दृष्टीकोन म्हणजे असे एक व्यासपीठ तयार करणे जे जागतिक सखोल तंत्रज्ञानाच्या नेत्यांसोबत भागीदारी करून एआयसह-पायलट विकसित करेल आणि त्यातून आपल्या शासन पद्धतीत मूलभूतपणे परिवर्तन घडू शकेल. मायक्रोसॉफ्टसोबतचे आमचे सहकार्य जटिल सायबर गुन्ह्यांच्या आव्हानांचे निराकरण करण्यापासून सुरू झाले होते, परंतु त्यांची क्षमता खूप मोठी आहे. एआय आज आरोग्यसेवा आणि शेतीपासून उद्योग आणि प्रशासनापर्यंत मानवी कार्यांच्या प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करते आणि अधिक प्रभावी, नागरिककेंद्री राज्यनिर्मितीसाठी आमचा या शक्तीचा जबाबदारीने वापर करण्याचा मानस आहे.”
महाक्राइमओएस एआय हे मायक्रोसॉफ्ट अझ्युर ओपनएआय सर्व्हिस आणि मायक्रोसॉफ्ट फाउंड्रीवर आधारित आहे. ते प्रगत एआय असिस्टंट, ऑटोमेटेड कार्यप्रवाह आणि सुरक्षित क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर एकत्र आणते. हा प्लॅटफॉर्म त्वरित केस निर्मिती, बहुभाषिक डेटा निष्पादन आणि संदर्भात्मक कायदेशीर सहकार्य देते. मानवी प्रयत्न कमी करते आणि अधिकाऱ्यांना जटिल सायबर गुन्ह्यांचे निराकरण करण्यावर लक्ष केंद्रित करणे शक्य करते. एकात्मिक एआय आरएजी आणि ओपन-सोर्स इंटेलिजेंसच्या मदतीने भारताच्या फौजदारी कायद्यांचा संदर्भ घेण्याबरोबरच महाक्राइमओएस एआय तपासकर्त्यांना प्रकरणे शोधण्यास, डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण करण्यास आणि धोक्यांना जलद आणि अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देण्यास मदत करते. मायक्रोसॉफ्ट इंडिया डेव्हलपमेंट सेंटरने (आयडीसी) खऱ्या जगातील पोलिसांच्या गरजांवर उपाययोजना आणण्यासाठी, तपासाची रचना मानकीकृत करण्यासाठी आणि सुरक्षित पालन शक्य करण्यासाठी सायबरआय आणि मार्व्हलसोबत जवळून काम केले आहे.
मायक्रोसॉफ्ट इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष पुनीत चांडोक म्हणाले: “एआय सार्वजनिक सुरक्षेच्या भविष्याची नव्याने व्याख्या करत आहे आणि महाक्राइमओएस एआयसह आम्ही हे स्वप्न प्रत्यक्षात आणत आहोत. मायक्रोसॉफ्ट अझ्युरच्या स्केलला अत्याधुनिक एआय क्षमतांसह एकत्र आणून आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक अधिकाऱ्याला जलद, स्मार्ट आणि अधिक सुरक्षितपणे तपास करण्यासाठी सक्षम करत आहोत. आम्ही फक्त तंत्रज्ञान देत नाही – तर विश्वास निर्माण करतो, नागरिकांचे संरक्षण करतो आणि भारतात डिजिटल सुरक्षिततेसाठी एक नवीन मानक स्थापित करत आहोत.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील प्रस्तावित राज्यव्यापी विस्तारामुळे महाराष्ट्रातील पोलिस ठाण्यांना प्रमाणित, एआयवर आधारित कार्यप्रणाली वापरून सायबर गुन्ह्यांची डिजिटल नोंदणी आणि तपास करण्यास सक्षम बनवले जाईल.
नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक आणि मार्व्हलचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष पोद्दार म्हणाले:“महाक्राइमओएस एआयमुळे सायबर गुन्ह्यांच्या लढ्याची व्याख्या नव्याने केली गेली आहे. त्यामुळे गुंतागुंतीच्या केसेस स्पष्ट होतील आणि वेगाने पुढे जातील. या प्लॅटफॉर्ममुळे तपास फक्त वेगवान होत नाही तर विश्वास निर्माण करणारे प्रशासनासाठी नवीन मानके स्थापित होतील आणि संपूर्ण भारतात पसरू शकेल असे मॉडेल तयार होईल.”
सायबरआयचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राम गणेश म्हणाले: “मायक्रोसॉफ्ट आणि मार्व्हलसोबतच्या आमच्या सहकार्यामुळे आम्हाला राज्याच्या दुर्गम भागातही जटिल सायबर गुन्ह्यांच्या तपास सहजतेने करता येईल आणि कामाचा भार कमी करण्यासाठी अत्याधुनिक उपाययोजनांद्वारे अधिकाऱ्यांना सक्षम होता येईल. मायक्रोसॉफ्टच्या तंत्रज्ञान क्षमतांचा फायदा घेऊन आम्ही कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांना भारताची डिजिटल ढाल तयार करण्यास आणि त्यांना नागरिकांचे जलद आणि आत्मविश्वासाने संरक्षण करण्यासाठी सक्षम बनवत आहोत.”
महाक्राइमओएस एआयचे अनावरण भारताच्या डिजिटल सुरक्षित समाजाच्या दृष्टिकोनाला साकार करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. मायक्रोसॉफ्ट, महाराष्ट्र शासन, मार्व्हल, सायबरआय आणि आयडीसी संपूर्ण भारतात डिजिटल सुरक्षितता आणि जबाबदार एआय स्वीकारण्यासाठी – कायद्याची अंमलबजावणी सक्षम करण्यासाठी आणि सुरक्षित, डिजिटल सक्षम राष्ट्रासाठी सरकारच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहेत.
मायक्रोसॉफ्ट (नॅस्डॅक “एमएसएफटी” मायक्रोसॉफ्ट) आपल्या ग्राहकांच्या विकसित गरजा पूर्ण करणारे नावीन्यपूर्ण उपाय देण्यासाठी एआयद्वारे समर्थित प्लॅटफॉर्म आणि साधने तयार करते. ही तंत्रज्ञान कंपनी एआय व्यापक स्वरूपात जबाबदारीने उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे. त्यांनी जगातील प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक संस्थेला जास्तीत जास्त प्रगती करण्यासाठी सक्षम करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे.






