
Businessman trading online stock market on teblet screen, digital investment concept
मुंबई : महाराष्ट्रातले उद्योग राज्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे म्हटले आहे. एफडीआय आकडेवारी गुजरातला पळवले, महाराष्ट्र गुंतवणुकीत खाली गेला अशा विरोधकांच्या आरोपादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट परकीय गुंतवणुकीच्या (एफडीआय) बाबतीत महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे जाहीर करताना ते म्हणाले की, महाराष्ट्राने एक वर्षासाठी निर्धारित केलेले उद्दिष्ट अवघ्या ६ महिन्यांत पूर्ण केले.
महाराष्ट्रात सहा महिन्यांत १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक आली आहे, जी पूर्वनिर्धारित उद्दिष्टाच्या जवळपास ९५% आहे. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ या शीर्षकाच्या पोस्टमध्ये फडणवीस यांनी जनतेचे अभिनंदन करताना लिहिले की, सप्टेंबरमध्ये संपणाऱ्या २०२४- २५ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे आकडे 7 आले आहेत. यावरून गेल्या ४ वर्षात राज्यात सरासरी १,१९,५५६ कोटींची गुंतवणूक आल्याचे स्पष्ट झाले. म्हणजे संपूर्ण वर्षभरातील ९४.७१ टक्के गुंतवणूक अवघ्या ६ महिन्यांत आली, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांनी ‘एक्स’वर राज्यातील थेट परकीय गुंतवणुकीवर भाष्य केले. त्यात म्हटले आहे की, पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो की, आपला महाराष्ट्र परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात सातत्याने अग्रेसर आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सप्टेंबर अखेरच्या दुसऱ्या तिमाहीतील आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यांत राज्यात १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाल्याचे दिसून येते. गेल्या चार वर्षांतील सरासरी पाहिली, तर महाराष्ट्रात वार्षिक १ लाख १९ हजार ५५६ कोटी रुपये गुंतवणूक आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या ९४.७१ टक्के गुंतवणूक ही फक्त ६ महिन्यांत आल्याचे दिसते. त्यासाठी मी महाराष्ट्राचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वाखाली आपल्या महाराष्ट्राची घोडदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाही देतो, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
आतापर्यंतची कामगिरी अशीवर्ष. गुंतवणूक (कोटी रुपये)२०२०-२१ १,१९,७३४२०२१-२२ १,९४,९६४२०२२-२३ १,१८,४२२२०२३-२४ ९,२५,१०९२०२४-२५ १,१३,२३६(एप्रिल ते सप्टेंबर ६ महिने) आकडे कोटी रुपयांत