
सलग तीन दिवसीय परिषदेत दुबईत व्यापार उद्योगसह विविध क्षेत्रातील उद्योग जगताविषयी मान्यवर करणार मार्गदर्शन
दुबई : परदेशातील नोकऱ्यांबरोबरच आता उद्योगविश्वातही मराठी माणसाचे पाउल पुढे पडावे मराठी उद्योजकाला व्यवसायासाठी जगभराची दारे उघडी व्हावीत,जगातील
मराठी उद्योजक एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करावे अशा अनेक संकल्पनेतून सुरू असलेलेल्या ग्लोबल इन्त्रोप्यूनर दुबई 2025 चे उद्गाटन दुबईत मोठ्या उत्साहात आणी जगभरातील मराठी उद्योजकांच्या प्रचंड प्रतिसादात उद्गाटन समारंभ पार पडला.
या परिषदेचे उद्घाटन भारत – दुबई,युनायटेड अरब इमिरातीचे वाणिज्य दूत सतीशकुमार सिवन, अल अली ग्रुप ऑफ कंपनीचे कार्यकारी संचालक दुबईचे एच. ई. याकुब अल अली ,जेष्ठ विचारवंत व लेखक संदीप वासलेकर, प्रतापराव पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी उद्गाटन सत्रात मार्गदर्शन केले .
सलग तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत जगभरातील विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजक आणि तज्ञ मार्गदर्शक या परिषदेस मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी नवउद्योजकांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. प्रास्ताविक मनोगत या परिषदेचे संयोजक व महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे उपाध्यक्ष सचिन इटकर यांनी केले. यावेळी पाहुण्यांचे स्वागत ‘गर्जे मराठी’चे आंनद गानू व पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कार्यकारी संचालक गिरीश देसाई यांनी केले.
भारत आणि दुबई संयुक्त अरब अमिरातीचे वाणिज्य दूत सतीशकुमार शिवन म्हणाले की, येत्या 2047 पर्यंत भारताचा विकास दर सहा दशलक्ष डॉलर पर्यंत जाईल. यामध्ये सर्व भारतीय उद्योजकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. जेष्ठ उद्योजक व सकाळ समूहाचे प्रतापराव पवार यांनी मराठी उद्योजकांनी प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेतली आहे. परंतु, मराठी उद्योजकांनी त्याला योग्य व्यवहाराची जोड देणे गरजेचे असल्याचे सांगितले. पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी मराठी उद्योजकांच्या या नव्या संकल्पनेचे कौतुक केले. तसेच, दुबई हे जगातील उद्योग जगताचे प्रवेशद्वार असून या संधीचा उद्योजकांना योग्य उपयोग करावा असे आवाहन केले.
दुबईतील उद्योजक व अल अली समूहाचे सर्वेसर्वा एच. इ. याकुब अल अली यांनी भारतीयांनी दुबईत आपला व्यवसाय वाढवावा आम्ही त्यांचे सदैव स्वागत करू आणि पूर्ण सहकार्य करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. आध्यात्मिक गुरु स्वामी ब्रह्मविहारी यांनी उद्योजकांना व्यवसायाबरोबर नैतिकता किती गरजेची आहे, याची महती सांगितली .
भारती विद्यापीठाचे सचिव व माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, युवक उद्योजकांनी नव्या संधी कशा निर्माण होतात त्याविषयी अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे अध्यक्ष अतुल शिरोडकर यांनी महाराष्ट्र राज्य उद्योगांमध्ये अग्रेसर राहण्यासाठी शासन आपल्या सर्वांच्या पाठीशी कायम उभे राहील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, प्रतापराव पवार, जेष्ठ विचारवंत तथा लेखक संदीप वासलेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, ‘गर्जे मराठी’ चे संस्थापक अध्यक्ष आनंद गानू, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे (एमइडीसी) अध्यक्ष अतुल शिरोडकर, पिंपरी- चिंचवड ट्रस्टच्या उपाध्यक्षा पद्मजा भोसले, गिरीश देसाई, कार्यक्रमाचे संयोजक सचिन इटकर यांसह देशातील आणि परदेशातील विविध क्षेत्रातील प्रमुख उद्योजक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.