
राज्यातील २४ लाख ८८ हजार ‘लाडक्या बहिणीं’ना मिळाले तीन मोफत सिलिंडर
मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने राज्यात लाडक्या बहिणींसाठी विविध योजना सुरू केल्या होत्या. महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये तर महिन्यातून तीन गॅस महिलांना फ्री योजना सुरू केल्या होत्या या योजनेमुळेच पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार मोठ्या बहुमताने स्थापन झाले आहे. लाडक्या बहिणींकरिता महायुती सरकारच्या वतीने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली होती. महायुती सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत गेल्या पाच महिन्यांत राज्यात मोफत २४ लाख ८८ हजार ४७ एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा खर्च सरकारने उचलल्यामुळे ‘लाडक्या बहिणीं’ ना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेमध्ये सर्वाधिक सिलेंडरचा लाभ पुण्यातील लाडक्या बहिणींना २ लाख ५८ हजार ८८० तर सर्वात कमी मुंबई शहरातील १० हजार २६८ लाडक्या बहिणींना मिळाला आहे.
राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या आकडेवारीतून ही माहिती उघड झाली आहे. केंद्र सरकारच्या ‘उज्ज्वला योजने’च्या धर्तीवर राज्यात तत्कालीन महायुती सरकारच्या २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’ अंतर्गत दरमहा १ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत घेणाऱ्या महिलांसाठी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’ अंतर्गत तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली गेली होती. ३० जुलै रोजी त्याचे परिपत्रकही निघाले होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांच्या नावावर कनेक्शन असणे बंधनकारक होते. याच योजनेतून राज्यात गेल्या महिन्यात २४ लाख ८८ हजार ४७ एलपीजी सिलिंडरचे वाटप केले गेले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ यांच्या नागपूर विभागातील 2,10,244 लाडक्या बहिणींना सिलेंडर मोफत योजनेचा लाभ मिळाला आहे. तर विद्यमान अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड विभागातील 30,991 लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ ठाण्यातील 1,36,565 लाडक्या बहिणींना लाभ मिळाला आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसते की, १ ऑगस्ट ते २९ डिसेंबर २०२४ या पाच महिन्यांत मुंबई शहरात १० हजार २६८, मुंबई उपनगरात १ लाख २८ हजार ८२३, ठाण्यात १ लाख २६ हजार ९८५, पुण्यात २ लाख ५८ हजार ८८०, नागपुरात २ लाख ५८ हजार २४४ लाडक्या बहिणींना मोफत तीन सिलिंडर देण्यात आले आहेत. मोफत गॅस सिलिंडर २ वाटपाची जबाबदारी या तेल कंपन्यांकडे आहे. त्याबदल्यात सरकार तेल कंपन्यांना प्रतिसिलिंडर सरासरी ८३० रुपये देत असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागातून मिळाली.
जिल्हानिहाय आकडेवारीअहमदनगर- 94,933अकोला – 41,514अमरावती – 77,326औरंगाबाद – 95,405बीड – 30,991भंडारा – 42,466बुलढाणा – 44,153चंद्रपूर – 57,008धुळे – 28,411गडचिरोली – 15,622गोंदिया – 37,222हिंगोली – 11,848जळगाव – 60,447जालना – 37142कोल्हापूर – 1,34,591लातूर – 50119मुंबई – 10,268मुंबई उपनगर – 1,28,825नागपूर – 2,10,244नांदेड – 68,160नंदुरबार – 13,568नाशिक – 1,22,261उस्मानाबाद – 28,355पालघर – 53080परभणी – 32,476पुणे – 2,58,880रायगड – 77,559रत्नागिरी – 62,803सांगली – 84,563सातारा – 1,13,301सिंधुदुर्ग – 29,381सोलापूर- 95,648ठाणे – 1,36,565वर्धा – 40,250वाशिम – 15,699यवतमाळ- 43,377