
#नवी दिल्ली : मोबाईल वापरकर्त्यांकरिता अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. अनेकांच्या नावावर बनावट सिमकार्ड नोंदवण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आपल्या नावावर बनावट सीमकार्ड तर नाहीत ना याची खातरजमा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जर तुमच्या आधार कार्डावर जास्त सिम कार्ड्स सक्रिय असतील, तर तुम्हाला त्याची माहिती घेऊन संशयास्पद सीमकार्ड्स ब्लॉक करणे आवश्यक आहे. नवीन टेलिकॉम कायद्यानुसार, एक आधार कार्डावर अधिकाधिक ९ सीमकार्ड्स सक्रिय असू शकतात. काही ठिकाणी (जसे जम्मू-कश्मीर, आसाम, आणि नॉर्थ-ईस्ट) या संख्येची मर्यादा ६ सीमकार्ड्स अशी आहे.
आधार कार्डावर किती सीमकार्ड सक्रिय आहेत, हे जाणून घेण्यासाठी खालील सोपी प्रक्रिया करून पहा:
- sancharsaathi.gov.in या वेबसाईटवर जा.
- होमपेजवर Citizen Centric Services मध्ये Know Your Mobile Connections वर क्लिक करा.
- तुमचा मोबाइल नंबर आणि कॅप्चा टाका.
- तुमच्या मोबाइलवर एक ओटीपी (One Time Password) येईल, तो टाका.
- आता तुमच्यासमोर सर्व सक्रिय सिम कार्ड्सची माहिती दिसेल, जी तुमच्या आधार कार्डावर असलेली असतील.
- जर तुम्हाला कोणतेही संशयास्पद सिम नंबर दिसले, तर “Not required” ऑप्शनवर क्लिक करून ते रिपोर्ट करू शकता.
सीमकार्ड ब्लॉक करण्यासाठी:
– सिम कार्ड डिएक्टिवेट होण्यास काही दिवस लागू शकतात, आणि या प्रक्रियेसाठी कोणतीही फी घेतली जात नाही.
९ पेक्षा जास्त सीमकार्ड्स:
नवीन टेलिकॉम कायद्यानुसार, एक आधार कार्डावर अधिकाधिक ९ सीमकार्ड्सच सक्रिय राहू शकतात. जर तुमच्या आधारावर यापेक्षा जास्त सिम सक्रिय असतील, तर ५० हजार ते २ लाख रुपये पर्यंत दंड लागू होऊ शकतो.
तर, जर तुम्हाला संशयास्पद सीमकार्ड्सच्या बाबतीत होणाऱ्या कायदेशीर पेचात अडकायचे नसेल, तर वरील पद्धतीने तपासणी करा आणि हे सीमकार्ड ब्लॉक करा.