
पुणे : समर्पणभावनेने, परिश्रमपूर्वक आणि आयुष्यात त्याला प्राधान्य देऊन केलेली कामे नेहमीच महान ठरतात. ज्या कार्यामुळे देश, समाज आणि विश्वाचे कल्याण घडते आणि जे कार्य निरपेक्ष तसेच पवित्र भावनेतून केले जाते, त्यालाच ईश्वरी कार्य म्हणतात. आपण करीत असलेले कार्य हे कोणत्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे नसून, ते ईश्वरी कार्य आहे, अशी भावना ठेवूनच ते पार पाडले पाहिजे. जेव्हा आपण राष्ट्रकार्याला सर्वोच्च प्राधान्य देतो, तेव्हाच ती कार्य यशस्वी होतात. यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील १०० वर्षे चालला, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांनी व्यक्त केले.
हिंदू आध्यात्मिक सेवा समितीच्या अध्यक्षपदी कोहिनूर ग्रुपचे चेअरमन उद्योजक कृष्णकुमार गोयल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मोतीबागेत झालेल्या निवड समितीच्या सभेत हिरेमठ बोलत होते. यावेळी सुहास हिरेमठ यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास समितीचे अखिल भारतीय संयोजक गुणवंतसिंग कोठारी व पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
समितीचे महामंत्री किशोर येनपुरे यांनी नवी कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये उपाध्यक्षपदी पंडित शिवकुमार शास्त्री, संयोजकपदी किशोर येनपुरे, तर सहसंयोजक पदी अॅड. संदीप सारडा यांची निवड झाली आहे. मठ-मंदिर उपाध्यक्ष म्हणून संजय भोसले, तसेच प्रशासकीय संस्था उपाध्यक्ष म्हणून सीए राधेश्याम अगरवाल व चरणजीत सिंग सहानी यांची निवड झाली. कार्यालय प्रमुख योगेश भोसले, रवि किरण नांदखिले तर कोषाध्यक्ष (कॉर्पोरेट) म्हणून नितीन पाटणकर, संजय गांधी, नितीन पैलवान व गुरुबक्षसिंह मखेजा यांची नेमणूक झाली आहे.
आयटी प्रमुखपदी विक्रम शेठ आणि कपिल कोराणे तर महाविद्यालय आणि शाळा विभागा साठी शैलेश प्रधान, प्रणव शेठ, सोनिया श्रॉफ, मनु राजन, राहुल जाधव प्रमुख असतील. सामाजिक संस्था प्रमुखपदी डॉ. प्रिती काळे आणि वैशाली लवांदे या काम पाहणार आहेत. याशिवाय कोष कॉर्पोरेट मार्गदर्शक प्रल्हाद राठी, दस्तावेजीकरण प्रमुख प्रकाश ढगे व उदय कुलकर्णी, जाती समूह प्रमुख सिद्धेश कांबळे व राजन बाबू यांची निवड झाली. प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क समितीत सीए डॉ. केतन जोगळेकर, कुंदन साठे, संतोष डिंबळे, सीए सुनील सुरतवाला व राजेश मेहता यांचा समावेश आहे. मातृशक्ती विभागाची जबाबदारी अॅड. कीर्ती कोल्हटकर, अनुपमा दरक आणि विद्या घाणेकर यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच मार्गदर्शक मंडळात महेश सूर्यवंशी, राजेंद्र भाटिया, सुभाष परमार व सुनंदा राठी यांची निवड करण्यात आली.एकूण ७० पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या नव्या कार्यकारिणीमुळे समितीच्या कार्याला नवी दिशा आणि ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.