
पुणे : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-२ च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बनावट गुटखा तयार करण्याच्या कारखान्यावर छापा टाकत मोठी कारवाई केली असून एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. थेऊर फाटा येथील कांबळेवस्ती भागातील एका गोदामावर छापा टाकत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी गोडावुन वर छापा कारवाई करून बनावट आर.एम.डी. गुटख्याची सुंगधीत तुंबाखु व विमल गुटखा पान मसाला तसेच गोडाऊनचे बाजुस शेतामध्ये बनावट गुटखा तंबाखु तयार करण्याठी लागणारे कच्चामाल त्यामध्ये बनावट सुपारी, सुंगधीत तंबाखु, थंडक, केमिकल, गुलाबपाणी, प्रिन्टेड पाऊच, बॉक्स व पोती असा एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बनावट गुटखा तयार करणाऱ्या कंपनीचा मालक रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता (वय २५, रा. काळुबाई मंदिरा जवळ, थेऊर, ता. हवेली), कामगार रामप्रसाद ऊर्फ बापु बसंता प्रजापती (वय ५०, रा. थेऊर गाव, मूळ उत्तरप्रदेश), अप्पु सुशिल सोनकर (वय ४६, रा. कांबळे वस्ती, थेऊर फाटा, मूळ रा. उत्तरप्रदेश), दानिश मुसाकीन खान (वय १८, रा. कांबळे वस्ती, थेऊर फाटा, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर, सुमित गुप्ता हा फरार झाला आहे. बनावट गुटखा व बनावट सुगंधीत तंबाखू तयार करणारे कंपनीचे मालक व कामगार यांच्याविरुध्द लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३.२२३,२७४,२७५, अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २००६, चे कलम २६ (२) (i) (iv) चे उल्लंघन केल्याने कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमली पदार्थ विरोधी-२ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड व कर्मचारी लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे पाचच्या सुमारास गस्त घालीत होते. त्यावेळी, थेऊर फाटा येथील कांबळे वस्ती येथे असलेल्या सुमित गुप्ता यांच्या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी पहाटे याठिकाणी छापा टाकला. याठिकाणी बनावट आरएमडी गुटख्याची सुंगधीत तुंबाखु व विमल गुटखा पान मसाला आढळून आला. तसेच, गोदामाच्या बाजूला शेतामध्ये बनावट गुटखा तंबाखु तयार करण्याठी लागणारा कच्चामाल मोठ्या प्रमाणावर पोलिसांच्या हाती लागला.
यामध्ये बनावट सुपारी, सुंगधीत तंबाखु, थंडक, केमिकल, गुलाबपाणी, प्रिन्टेड पाऊच, बॉक्स व पोती यांचा समावेश आहे. पोलिसांनी बनावट गुटखा वाहतुक करण्यकरिता मॉडिफाय केलेली गोल्डन रंगाची इनोव्हा कार (एमएच ४४, बी २०२३), गोल्डन रंगाची इनोव्हा कार (एमएच १२, डीएम ०८८५), काळया रंगाची टाटा नॅक्सोन (एमएच १२, क्युटी ८४६२) अशा तीन चारचाकी जप्त केल्या आहेत. याठिकाणी पोलिसांनी १ लाख ३० हजारांची रोकड देखील जप्त केली.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त पकंज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड, तसेच पोलीस अंमलदार राजस शेख, संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, संदिप देवकाते, गणेश गोसावी, देविदास वांढरे, शुभांगी म्हाळसेकर, दिनेश बारटेवाड यांनी केली आहे.







