
तक्रार निवारण, मतदार मदत कक्ष तसेच मिडिया कक्ष
पुणे : महानगरपालिका निवडणुका पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाच्यावतीने मुख्य महापालिका भवन व महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालय स्थरावर तक्रार निवारण, मतदार मदत कक्ष तसेच मिडिया कक्ष उभारण्यात आला आहे.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदारांना येणाऱ्या अडचणी, तक्रारी, आचारसंहितेचे उल्लंघन, मतदान केंद्रावरील समस्या आदी बाबींची तात्काळ दखल घेऊन निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण व मतदार मदत कक्ष मुख्य पालिका भवन येथे स्थापन करण्यात आलेला आहे. हा कक्ष निवडणूक कालावधीमध्ये आठवड्याचे सातही दिवस अहोरात्र या वेळेमध्ये कार्यान्वित राहणार आहे. शहरातील नागरिक व मतदारांनी आपल्या काही तक्रारी / सूचना असल्यास सदर कक्षाकडे नोंदवाव्यात. निवडणूक प्रक्रियेत सर्व नागरिकांनी सहकार्य करावे व कोणतीही अडचण असल्यास तात्काळ संबंधित कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
तक्रार निवारण कक्ष आपत्ती व्यवस्थापन विभाग, दुसरा मजला, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका.
संपर्क – ०२०-२५५०-१४९०
ई-मेल आयडी- [email protected]
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता १५ डिसेंबर २०२५ रोजी पासून संपूर्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रासाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली हरकती/तक्रार नोंदविण्याची सोय करण्यात आली आहे. तरी नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत काही हरकती/तक्रार असल्यास क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उभारण्यात आलेल्या कक्षात संपर्क करावा.






