
७४ सुपरहिट चित्रपटांचा विक्रम आणि २४० हून अधिक चित्रपटांतील अविस्मरणीय भूमिका त्यांच्या वारशाचा पुरावा आहेत. शोले, सत्यकाम, अनुपमा, चोरी चोरी, धरमवीर ते शोलेमधील वीरू—त्यांनी साकारलेली अनेक पात्रे आजही जनमानसात जिवंत आहेत. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या नियमाने भारतीय चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. १९६० मध्ये अभिनयात पदार्पण केलेल्या धर्मेंद्र यांनी सहा दशके आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या नावावर ७४ हिट चित्रपटांचा विक्रम आहे. तर २४० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. यामध्ये शोले सारख्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचाही समावेश आहे. ‘इस’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठाला धर्मेंद्र यांचा इशीस हा चित्रपट येत्या २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र त्यापूर्वीच धर्मेंद्र यांची एक्झिट चाहत्याच्या मनाला चटका लावून जाणारी ठरली. सोमवारी त्यांच्या शेवटच्या चित्रपट “इक्किस” मधील एक लूक प्रदर्शित झाला. अभिनेत्याच्या आवाजातील एक इस नोट देखील शेअर करण्यात आली, ज्यामुळे त्यांचे चाहते भावूक झाले. इंस्टाग्रामवर २१ चे पोस्टर शेअर करताना चित्रपटाच्या निर्मात्यांनी लिहिले की, वडील मुलांचे संगोपन करतात. महान पुरुष राष्ट्र घडवतात.
२१ वर्षीय अमर सैनिकाचे वडील म्हणून धर्मेंद्रजी एक भावनिक शक्ती आहेत. ‘बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना ।’ आणि ‘कुते … कमीने, मैं तेरा खून पी जाऊंगा।’ ७० च्या दशकात, शोले चित्रपटातील हे संवाद तरुणांच्या तोंडावर होते. कुले, मैं तेरा खून पी जाऊंगा, परमवीर चित्रपटातील हा संवादही खूप गाजला. या संवादावर तेव्हा चित्रपटगृहे टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. धर्मेंद्र यांचे संवाद उत्कटतेने, प्रेमाने आणि ग्रामीण स्वभावाने भरलेले होते. पंजाबमधील नसराली या छोट्याशा गावात जन्मलेले धर्मेंद्र हे एका सरकारी शाळेतील मुख्याध्यापकाचे पुत्र होते. आज देश त्यांना “ही मॅन” म्हणून ओळखतो. दहावीत असताना दिलीप कुमार यांचा चित्रपट पाहिल्यानंतर नायक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या धर्मे द्र यांना एका प्रतिभा शोध स्पर्धेने हिंदी चित्रपटसृष्टीशी अशा प्रकारे जोडले की आजही त्यांना वेगळे मानणे अशक्य आहे. ते कायम चाहत्यांच्या स्मरणात राहतील. धर्मेंद्र नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांशी त्यांच्या मनातील भावना शेअर करत असत. धर्मेंद्र काही वर्षांपूर्वी मुंबई सोडून गेले होते. शहराच्या टूर असलेल्या त्यांच्यामध्ये ते राहत होते. त्यामुळे ते फक्त शूटिंगसाठी मुंबईला येत असत. धर्मेद्र हिंदी चित्रपटसृष्टीत प्रचंड प्रसिद्धी आणि मळवली, त्यांना शेती आणि प्राण्यांची खूप आवड होती. म्हणूनच, ते मुंबईपासून लोणावळा आणि खंडाळा दरम्यान असलेल्या त्याच्या फार्महाऊसमध्ये दूर राहत होते. पूर्वी, त्यांची दुसरी पत्नी, हेमा मालिनी त्यांच्यासोबत तिथे राहत होती. पण, त्या कामासाठी वारंवार मुंबईला जायच्या म्हणून त्या आता फार्महाऊसला येत नव्हत्या. त्यांची पहिली पत्नी, प्रकाश कर, आता त्यांच्यासोबत तिथेच राहायची. ते बन्याच काळापासून आजारी होते आणि त्यामुळे ते त्यांच्या कुटुंबाला भेटू शकत नव्हते. त्याबद्दल खूप वाईट वाटतं. त्यांनी एकदा त्यांच्या मुली ईशा आणि आता तसेच त्यांची पत्नी हेमा मालिनी यांच्यापासून राहिल्याबद्दल खंत व्यक्त केली. धर्मेंद्र यांचे हे घर पंढऱ्या श्रीमवर आधारित घर साधेपणा, शांतता आणि क्लासिक डेकोरचे उम उदाहरण आहे.
नितीपासून फर्निचरपर्यंत सर्वत्र पांढऱ्या रंगाची सुसंगती दिसते. घरात ठेवलेले जुने फोटो, आठवणींचे प्रेम, आणि लाकडी डेकोर पीसेस त्यांच्या ९० वर्षांच्या प्रवासाची कहाणी सांगतात. घरात मोठी खिडक्या, नैसर्गिक प्रकाश आणि शांत वातावरणामुळे सकारात्मकता जाणवते. त्यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये बागेचा सुंदर नजारा, साथी पण आकर्षक बैठक व्यवस्था आणि शांततेची अनुभूती देणाऱ्या सजावटीच्या वस्तू दिसतात. त्यांच्या घरातील प्रत्येक कोपरा त्यांच्या जीवनातील आठवणी आणि अनुभवांनी समृद्ध झालेला आहे. हे घर केवळ दिसायला सुंदर नाही, तर त्यात त्यांच्या साधेपणाचे प्रतिबिंबही दिसून येतो. एकापेक्षा एक यशस्वी चित्रपट देणाऱ्या कलाकारांपैकी एक ते मानले जात होते. आपल्या सिनेकारकिर्दीत, त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक हिट चित्रपमध्ये काम करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
१९९७ मध्ये, बॉलीवूडमधील त्यांच्या योगदानासाठी त्यांना फिल्मफ अर जीवनगौरव पुरस्कार मिळाला. राजस्थानमधील बिकानेर येथून २००४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार झाल्यानंतर, धर्मेंद्र उर्फ केवल कृष्ण देओल यांचा दिल्लीच्या राजकीय पटलावर उदय झाला. मात्र प्रत्यक्ष दिल्लीत येऊन खासदार म्हणून अल्पावधीतच त्यांचा भ्रमनिरास होत गेला. परिणामी २००९ मध्ये कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी राजकारणातून माघार घेतली आणि भाजपचा अह असूनही पुन्हा निवडणूक लढवली नाही. बॉलीवूडच्या पडद्यावरील या ही मॅनचे मन राजकीय रंगमंचावर रमलेच नाही. राममंदिर आंदोलनानंतर चित्रपट- दूरचित्रवाणी तारे-तारकांना मोठ्या प्रमाणात तिकीटे देगे भाजपने सुरू केले. त्यानंतर २००४ मध्ये धर्मेंद्र यांच्या राजकारण प्रवेशाचे वर्णन भाजप नेते एक मास्टरस्ट्रोक असे करत. स्टार म्हणून त्यांची प्रतिष्ठा, जनतेमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता आणि राजस्थानातही त्यांच्या चित्रपटांचे प्रचंड चाहते असल्याने, धर्मेंद्र यांना बिकानेरमधून उमेदवारी देणे हा भाजपच्या तेव्हाच्या रणनीतीचाही महत्त्वाचा भाग होता.
धर्मेद्र यांची लोकप्रियता इतकी होती की शक्तिशाली कॉंग्रेस नेते रामेश्वरलाल दुडी यांचा ६०,००० पेक्षा जास्त मतांनी पराभव करून ते लोकसभेत पोहोचले. संसद सदस्य म्हणून काम करण्यासाठी केवळ चित्रपट जगताचे ग्लॅमर, लोकप्रियता पुरेशी नाही हे धर्मेंद्र यांना समजत गेले तसतसे राजकारणापासून मन विटत गेले. पक्षांतर्गत राजकीय संघर्ष, दिल्लीची गुंतागुंतीची राजकीय व्यवस्था आणि फाईल्सच्या डोंगरांतून वाट काढण्याचे जग धर्मेंद्र यांच्यासारख्या रोखठोक व्यक्तिमत्वाला पटण्यासारखे नव्हते. राजकारणाची भाषा, पद्धती आणि लोक आपल्याला आवडत नव्हते असे अनेक मुलाखतींमध्ये धर्मेंद्र यांनी स्पष्टपणे सांगितले. विकारसाठी आपण अनेक विकास प्रकल्प राबवले होते, परंतु सत्तेच्या आणि व्यवस्थेच्या गुंतागुंतीमुळे श्रेय दुसऱ्याला गेले. नंतरच्या काळात, संसद आणि राजकारण माझ्यासाठी नव्हते, तो माझा प्रांतच नव्हता, असे धर्मेंद्र यांनी उघडपणे कबूल केले. राजकारणात येणे ही चूक होती असे मी म्हणणार नाही की पण हो, एखाद्या अभिनेत्याने राजकारणात येऊ नये. अभिनेत्याने नेहमीच अभिनेता राहावे, अशी भावना धर्मेंद्र यांनी व्यक्त केली होती. बॉलिवूडचा एवहीन आणि अभिजात अभिनेता धर्मेद्र आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. नैसर्गिक अभिनय देखणा अंदाज आणि साधेपणामुळे तो खऱ्या अर्थाने ‘रिअल हीरो’ मानला जातो. एक अभिनेता, निर्माता म्हणून हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी जी अमिट छाप सोडलीय, ती आजदेखील सदाबहार आहे. अशा या महान आणि अष्टपैलू अभिनेत्याचे निधन सर्व चित्रपटसृष्टीसोबतच त्यांच्या लाखो चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेले आहे. त्यांनी शोले चित्रपटात साकारलेला अविस्मरणीय र जनमानसाच्या मनात कायमचा घर करुन गेला यात मिळमात्र शंका नाही. एक अभिनेता आणि सुंदर मनाचा माणूस म्हणून धर्मेंद्र यांना सदोदित स्मरणात ठेवले जाईल.
-आरिफ आसिफ शेख,
मो. 9881057868







