
पुणे : शहरासह देशात सायबर चोरट्यांकडून फसवणूकीचे सत्र सुरुच आहे. सायबर चोरट्यांनी गुंतवणुकीच्या मांजरीतली तिघांची ७७ लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका तरुणाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुण मांजरी भागात राहायला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी ऑक्टोबर महिन्यात फिर्यादीच्या मोबाइलवर मेसेज पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे त्याला आमिष दाखविले होते. त्या आमिषाला बळी पडून फिर्यादीने पैसे गुंतविण्यास सांगितले. फिर्यादीने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी १३ लाख सात हजार रुपये जमा केले. सुरुवातीला तरुणाला चोरट्यांनी परतावा दिला नाही. त्यानंतर परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गौड तपास करत आहेत
सायबर चोरट्यांनी लोहगाव भागातील एका व्यावसायिकाची ४७ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत व्यावसायिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे तपास करत आहेत. सायबर चोरट्यांनी गुंतवणुकीच्या आमिषाने कोंढवा भागातील एकाची १६ लाख ८४ हजार १९२ रुपयांची फसणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.
वर्षभरात सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे किमान दोन ते तीन गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल होतात.