
चंद्रकांत पाटील यांच्या साधेपणाने भारावले रिक्षाचालक
पुणे : विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा प्रचार जोरदार सुरू आहे. पाटील हे आपल्या सांधेपनासाठी ओळखले जातात. त्यांच्या साधेपणाने रिक्षाचालक बांधव देखील भारावले. मतदारांच्या भेटीगाठीसाठी त्यांनी चक्क रिक्षातून प्रवास केला. यावेळी त्यांनी रिक्षा चालकांशी मनमोकळा संवाद साधला.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोचला आहे. पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून मतदारांच्या भेटीगाठीसोबतच प्रचाराठी बाईक रॅली, कॉर्नर सभा, सोसायटी भेट अशा विविध मार्गांनी मतदारांपर्यंत पोहोचून आपल्या पाच वर्षातील कार्यअहवाल देण्यासोबतच भविष्यातील कामाबद्दल माहिती देत आहे.
सोमवारी त्यांनी रिक्षातून प्रवास करत मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांनी प्रभाग क्रमांक ११ मधील जयभवानी नगर मधील शिवसेना नेत्या रंजना दळवी यांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी नगरसेविका लिना पानसरे, भाजपा कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला हे देखील उपस्थित होते.