February 4, 2026

मनोरंजन

कोहिनूर कट्टा प्रस्तुत ‘दशावतार नाबाद १००’ कार्यक्रमाअंतर्गत कलाकारांचा सत्कार, गप्पा पुणे : दशावतार चित्रपटाची संकल्पना माझ्या मनाला भावली. दशावतार कला प्रकाराविषयी मी ऐकून होतो; परंतु प्रत्यक्षात मी हा कलाप्रकार कधीही पाहिला नव्हता. त्यामुळे चित्रपटातील बाबुली मेस्त्री ही भूमिका साकारताना आव्हाने घेता येतील याचा वास मला लागला. या भूमिकेत काही तरी करण्यासारखे आहे, असे जाणवल्याने मी ही भूमिका स्वीकारली, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केल्या. कोकणातील परंपरा, वारसा, संस्कृती, पर्यावरण रक्षण यावर भाष्य करणारा २०२५ मधील बहुचर्चित चित्रपट ‘दशावतार’ शंभर दिवसांचा नाबाद प्रवास पूर्ण करीत आहे. त्या निमित्त कोहिनूर कट्टा प्रस्तुत ‘दशावतार १००’ या कार्यक्रमाअंतर्गत चित्रपटातील कलाकारांशी संवाद आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा आज (दि. २४) आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी दिलीप प्रभावळकर बोलत होते. कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे कार्यकारी संचालक प्रकाश मगदूम, लागू बंधूंचे सारंग लागू तसेच संयोजक वीरेंद्र चित्राव यांची विशेष उपस्थिती होती. कोहिनूर ग्रुप, एनएफडीसी आणि लागू बंधू यांच्या सहकार्याने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दृक्‌श्राव्य कार्यक्रमात दिलीप प्रभावळकर यांच्यासह...
भारतीय चित्रपटसृष्टीने आज एक सुवर्णयुग मागे सोडले आहे. पडद्यावरचा देखणा, दमदार आणि रोमँटिक हीरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...
सदाबहार अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन; ‘एक जिंदादिल युग संपले’ मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार,...
‘वन्दे मातरम्‌‍‌’ गौरव महोत्सवाचे उद्घाटन पुणे : वंदे मातरम्‌‍ हे गीत राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेल्या राष्ट्रचिंतनाचे प्रतीक आहे. हे गीत...
रागेश्री संगीत विद्यालयाच्या भजनी वर्गाचे स्नेह संमेलन उत्साहात पहाटेचे गार वारे… तालासुरांच्या सोबतीने आळवले जाणारी भजने… भजनाच्या...