
महिलेशी अश्लिल वर्तन करणार्या टिम लीडरवर गुन्हा दाखल
तुझा पगार वाढवतो, प्रमोशन देतो, त्या बदल्यात मला काहीतरी पाहिजे, म्हणत केला विनयभंग
पुणे : महिलेला स्वत:च्या कारमध्ये बसवून तिलाा तुझा पगार वाढवतो, प्रमोशन देतो, त्या बदल्यात मला काहीतरी पाहिजे, असे म्हणून महिलेसोबत अश्लिल वर्तन करणार्या टिम लिडरावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका ३८ वर्षाच्या महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अनिकेत रिठे (रा. ससाणेनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार खराडी येथील एका आय टी कंपनीतच्या पार्किंगमध्ये ३ आॅक्टोबर रोजी पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी अनिकेत रिठे हे एकाच आय टी कंपनीत कामाला आहेत. अनिकेत रिठे हा टिम लिडर आहे. कंपनीत असताना पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अनिकेत रिठे याने फिर्यादी यांना तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून कंपनीचे पार्किंगमध्ये स्वत:च्या कारमध्ये बसविले. तुझे प्रमोशन करतो व तुझा पगार वाढवतो, त्या बदल्यात मला काहीतरी पाहिजे, असे म्हणाला. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला असताना त्यांचे चुंबन घेऊन त्यांच्याबरोबर अश्लिल वर्तन करुन विनयभंग केला. सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख तपास करीत आहेत.







