टिळक रोडवर सिगारेट ओढत थांबलेल्या तरुणाला हटकल्याने दुचाकीस्वाराला केली बेदम मारहाण, पोलिसांनी टोळ भैरवाला केली अटक
पुणे : टिळक रोडवर रस्त्यात सिगारेट ओढत थांबलेल्या टोळ भैरवाला बाजूला हो असे सांगितल्याने झालेल्या वादात दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली़ या टोळभैरवाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.
विपुल गुल्लापेल्ली (वय १९, रा. मिठापेल्ली निवास, पालखी चौक, नाना पेठ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सौरभ विनायक मेथे (वय ३२, रा. श्री राम अपार्टमेंट, सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सदाशिव पेठेतील एस पी कॉलेजवळ टिळक रोडवर २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सौरभ हे २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास टिळक रस्त्यावरुन कामावर जात होते. त्या वेळी सदाशिव पेठेतील टिळक रोडवरील टपाल कार्यालयासमोर गुल्लापेली हा सिगोरट ओढत थांबला होता. रस्त्यात सिगारेट ओढणाºया गुल्लापेल्लीला सौरभ यांनी बाजूला होण्यास सांगितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी तू समाजसेवा करु नको, असे गुल्लापेल्लीने त्यांना म्हणाला. या कारणावरुन त्यांच्यात वादावादी झाली. गुल्लापेल्लीने सौरभ यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यांच्या डोक्यात दगड घालून जखमी केले. पोलिसांनी गुल्लापेल्ली याला अटक करण्यात आली असून, पोलीस हवालदार भुजबळ तपास करत आहेत.




