लाच मागणारा सहायक पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपतच्या जाळ्यात
गुन्ह्यात मदत करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले
पुणे : लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच मागणार्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २० हजार रुपयांची लाच घेताना सापळा रचून पकडले़.
शकील मोहम्मद शेख (वय ४५) असे या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. शकील शेख हा लोणावळा शहर पोलीस ठाण्यात नेमणुकीला आहे.
तक्रारदार यांच्याविरुद्ध लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक शकील शेख यांच्याकडे देण्यात आला होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी शकील शेख याने तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली. याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे २३ सप्टेंबर रोजी मिळाली. तक्रारीच्या अनुषंगाने २३, २४ व २५ सप्टेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. २५ सप्टेंबर रोजीच्या पडताळणीमध्ये शकील शेख याने गुन्ह्यांचे तपासामध्ये मदत करण्यासाठी साहेबांना देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागणी करुन तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी लोणावळा शहर पोलीस ठाण्याअंतर्गत नारायणीधाम पोलीस चौकीत सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून २० हजार रुपये स्वीकारताना शकील शेख याला पकडण्यात आले. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर व त्यांच्या सहकार्यांनी सापळा कारवाई केली आहे. सहायक पोलीस आयुक्त भारती मोरे अधिक तपास करीत आहेत.