
राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री, तर बावनकुळे यांच्याकडे नागपूर आणि अमरावतीची जबाबदारी
चंद्रकांत पाटील यांच्याकडे सांगलीची धुरा; पंकजा मुंढे यांना जालन्यात स्थान
मुंबई : महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर अखेर आज १८ जानेवारी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहरचं पालकमंत्रिपद असणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांना या पालकमंत्रिपदाच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. आता बीडचे पालकमंत्री अजित पवार असणार आहेत. तसेच धनंजय मुंडे यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.
कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कोणाकडे?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गडचिरोली
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : ठाणे आणि मुंबई शहर
उपमुख्यमंत्री अजित पवार : पुणे आणि बीड
चंद्रशेखर बावनकुळे : नागपूर आणि अमरावती
राधाकृष्ण विखे पाटील : अहिल्यानगर
हसन मुश्रीफ : वाशिम
चंद्रकांतदादा पाटील : सांगली
गिरीश महाजन : नाशिक
गणेश नाईक : पालघर
गुलाबराव पाटील : जळगांव
संजय शिरसाट : छत्रपती संभाजीनगर
पंकजा मुंडे : जालना
आशिष शेलार : मुंबई उपनगर व सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा
उदय सामंत : रत्नागिरी
अतुल लिलावती मोरेश्वर सावे : नांदेड
प्रकाश आबिटकर : कोल्हापूर व माधुरी मीरा सतिश मिसाळ (सह-पालकमंत्री)
शिवेंद्रसिंह भोसले : लातूर
आदिती तटकरे : रायगड
शंभूराजे देसाई : सातारा
नितेश राणे : सिंधुदुर्ग
नरहरी झिरवाळ : हिंगोली
भंडारा- संजय सावकारे
धाराशिव- प्रताप सरनाईक
बुलढाणा- मकरंद जाधव-पाटील
अकोला- आकाश फुंडकर
गोंदिया- बाबासाहेब पाटील
गडचिरोली- आशिष जयस्वाल सह-पालकमंत्री
वर्धा- पंकज भोयर
परभणी- मेघना साकोरे-बोर्डीकर