
नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात एका ज्वेलरी दुकानावर बंदुकीचा धाक दाखवून सोन्याच्या दागिन्यांची लूट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
तीन आरोपी बुर्का परिधान करून दुकानात घुसले, तर एक आरोपी बाहेर नजर ठेवून होता. काही मिनिटांतच दागिने लुटून आरोपी फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच सीवूड्स पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात दरोडेखोरांनी आधीच रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
#NaviMumbai #Seawoods #BreakingNews #JewelleryRobbery #CrimeNews







