
लैंगिक अत्याचार प्रकरणी संस्थाचालक अन्वित फाटकला अटक
पुणे : कर्वेनगरमधील एका नामांकित शाळेतील नृत्यशिक्षकाने तब्बल ४ लहान मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी संस्थाचालकाला अटक केली आहे.
अन्वित सुधीर फाटक असे या संस्थाचालकाचे नाव आहे. कर्वेनगरमधील एका नामांकित शाळेतील नृत्यशिक्षकाने लहान मुलांवर लैंगिक व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर अत्याचार केले. मुलावर अत्याचार करतानाचे त्याचे मोबाईलमध्ये रेकॉडिंग करुन ती इतर लोकांना पाठविण्याची धमकी दिली. तसेच मुलाला शपथ देऊन मारण्याची धमकी दिली. हा प्रकार नोव्हेंबर पासून १४ डिसेंबर पर्यंत सुरु होता.
यासंदर्भात सर्व कायदेशीर बाबी तपासून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पालकांना दिले. कोणत्याही दबावाला बळी पडता पोलिस कारवाई करतील,असेही अमितेश कुमार यांनी पालकांना आश्वस्थ केले. नृत्य शिक्षकाने अत्याचार केल्या प्रकरणी एकूण चार गुन्हे दाखल झाले आहेत. आणखी काही लहान मुलांवर अत्याचार झाल्याचे समुपदेशादरम्यान निदर्शनास आले आहे. त्याबाबतही तपास करावा, अशी मागणी पालकांच्या शिष्टमंडळाने केली.
शाळेत गेली दोन वर्षे हा प्रकार घडत आहे. मुलांनी ही बाब शिक्षकांना सांगितल्यावर हा प्रकार उघड झाला आहे. शाळा प्रशासनाकडून याबाबतीत अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यासाठी संस्थाचालक अन्वित पाठक व ट्रस्टी तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली.
शाळेकडून सीसीटीव्ही सर्वेलन्स केले जात नाही. सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नाहीत. मुलांचे ‘गूड टच, बॅड टच’चे समुपदेशन होत नाही. पालक व शिक्षकांच्या बैठका वेळेवर होत नाहीत. शिक्षकांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट तपासले जात नाही. संस्थेचे प्रशासन याबाबत गांभिर्याने पाहत नाही. त्यामुळे या घटना घडत असल्याचे पालकांनी पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आणले.
याबाबत शिक्षण आयुक्त व पोलीसस अधिकाऱ्यांशी बोलून त्यावर ठोस कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात पोलिस प्रशासन कोठेही कमी पडणार नाही आणि तपासात दोषी आढळलेल्या संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
याबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नृत्यशिक्षकाला कालच अटक केली होती. या घटनेत निष्काळजीपणा दाखविल्याने संस्था चालक अन्वित फाटक याला अटक केली आहे.
दरम्यान, या शाळेमध्ये समुपदेशादरमयान आणखी काही लहान मुलांवर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबतही तपास करावा, अशी मागणी पालकांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट देऊन केली. या प्रकारात शाळा प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे संस्थाचालक अन्वित पाठक व ट्रस्टी तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
शाळेत मुलांचे गुड टच, बॅड टचचे समुपदेशन होत नाही. पालक व शिक्षकांच्या बैठका वेळेवर होत नाही. शिक्षकांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट तपासले जात नाही. संस्थेचे प्रशासन याबाबत गांभिर्याने पहात नाही. त्यामुळे या घटना घडत असल्याचे पालकांनी पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणले.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
पुण्यातील कर्वेनगर परिसरात एका शाळेत आरोपी मंगेश साळवे हा डान्स टीचर म्हणून कार्यरत होता. नृत्य शिकवत असताना साळवे हा शालेय विद्यार्थ्यांच्या शरीराला जाणून बुजून हाथ लावत असे. एका 11 वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्याबाबत घडलेला प्रकार समुपदेशन सुरू असताना सांगितला आणि त्यानंतर त्याच्या आई वडिलांना देखील याबाबतची माहिती दिली आणि तात्काळ त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी सुद्धा प्रकरण गांभीर्याने घेत शिक्षक मंगेश साळवे याला अटक केली. यापूर्वी सुद्धा त्याने इतर विद्यार्थ्यांवर लैंगिक छळ केल्याचे समोर आल होतं. आरोपीवर अशा प्रकारचा गुन्हा केल्याप्रकरणी आणखी एका गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौथी आणि सहावीमध्ये शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या सोबत हा प्रकार घडला आहे. शाळेतील एक शिक्षक हा 2022 पासून कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर कार्यरत आहे. काल तक्रार येताच आम्ही तात्काळ या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपीला अटक केली आहे. आम्ही त्याची वैद्यकीय तपासणी करत आहोत तसेच शाळेतील ज्या विद्यार्थ्यांच्या बाबत हा प्रकार घडला आहे त्यांचे देखील स्टेटमेंट घेतली आहेत, अशी माहिती पोलीस उपयुक्त संभाजी कदम यांनी दिली. हा सगळा प्रकार शाळेत सुरू असलेल्या समुपदेशनमुळे समोर आला. शाळेच्या मधल्या वेळेत आरोपीने हे कृत्य केलं आहे. याप्रकरणात 4 वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. वारजे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.