
बांधकाम व्यावसायिकाला ५ लाखांची मागितली खंडणी
तू टिप दिल्याने माझी जेल इंन्ट्री झाल्याचे सांगून जीवे ठार मारण्याची दिली धमकी
पुणे : एकाच सोसायटीत राहणार्या गुंडाने बांधकाम व्यावसायिकाला तू पोलिसांनी माझी टिप दिल्याने माझी जेल इंन्ट्री झाली, असे म्हणून मारहाण करुन २ लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे
याबाबत जहीर मकसुद शेख (वय ४०, रा. दुराणी कॉम्पलेक्स, मिठानगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रिझवान नईम मेमन (वय २४, रा. दुराणी कॉम्पलेक्स, मिठानगर, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जहीर शेख हे बांधकाम व्यावसायिक आहेत. रिझवान नईम मेमन व जहीर शेख हे एकाच सोसायटीत राहतात. जहीर शेख हे २२ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता कामानिमित्त सोसायटीचे बाहेर पायी जात असताना रिझवान मेमन याने शेख यांना अडवून त्यांची कॉलर पकडली व म्हणाला, की तुने मेरे बारे में पोलीस को टिप दिएला है, तेरे वजह से मेरे को जेल इंन्ट्री हो गई है, असे म्हणून हाताने कानाखाली व डोक्यात मारुन शिवीगाळ केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करु लागला. त्यावेळी जहीर शेख हे बचाओ, बचाओ असेओरडू लागले. त्यांचा आवाज ऐकून सोसायटीमधील लोक धावून आले. लोक येत असल्याचे पाहून रिझवान मेमन याने कमरेला असलेले लोखंडी हत्यार काढून लोकांच्या दिशेने रोखून कोई आगे आया तो जिंदा नही छोडुंगा, जानसे मार दुंगा, अशी धमकी देताच सोसायटीतील लोक घाबरुन पळून गेले. रिझवान मेमन याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन धरुन हिसकाविण्याचा प्रयत्न केला. २ लाख रुपये दे नाहीतर तुझा मर्डर करीन, अशी धमकी दिली. जहीर शेख यांनी त्याच्या तावडीतून सुटका करुन घेऊन ते घरी पळून गेले. या प्रकाराची माहिती त्यांनी मित्रांना दिली. मित्रांनी धीर दिल्यावर त्यांनी गुरुवारी त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव तपास करीत आहेत.


