
पुणे : राज्याच्या राजकारणात मोठा संकेत देत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट लवकरच एकत्र येणार असल्याचा दावा माजी महापौर व प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय धनकवडे यांनी केला आहे.
दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून, ताई आणि दादांमध्येही संवाद झाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
धनकवडे म्हणाले की, येत्या दोन दिवसांत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ३८ प्रभागांचा तिढा लवकरच सुटेल. आगामी निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढवली जाईल. शहर व राज्य पातळीवर नेतृत्वामध्ये एकमत झाले आहे.
या वक्तव्यामुळे पुणे आणि राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याने आगामी निवडणुकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
#PunePolitics #NCPNews #MaharashtraPolitics #PoliticalUpdate #NCPUnity






