
प्रत्येक शेअरधारकाला मिळणार 1:1 अनुपातात नवा शेअर
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) मोठ्या कॉर्पोरेट बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. कंपनीने आपल्या आइसक्रीम व्यवसायाचे विभाजन (Demerger) करण्याचा निर्णय घेतला असून, HUL व क्वालिटी वॉल्स इंडिया (KWIL) असे दोन स्वतंत्र विभाग निर्माण होणार आहेत.
या घोषणेनंतर 1 डिसेंबर रोजी HUL चा शेअर भाव 1% पेक्षा जास्त वाढला. कंपनीने स्पष्ट केले आहे की HUL च्या प्रत्येक 1 शेअरच्या बदल्यात शेअरधारकांना क्वालिटी वॉल्सचा 1 नवा शेअर दिला जाणार आहे.
5 डिसेंबर—रेकॉर्ड डेट निश्चित
कंपनीने डीमर्जरनंतर नवीन शेअर्स मिळण्याची पात्रता ठरवण्यासाठी 5 डिसेंबर ही रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केली आहे. त्यानंतर नवीन शेअर्सचं अलॉटमेंट 29 डिसेंबर रोजी केले जाईल.
कधी होणार क्वालिटी वॉल्सची लिस्टिंग?
NSE ने 28 नोव्हेंबरला जाहीर केले की क्वालिटी वॉल्स इंडिया (KWIL) ला 5 डिसेंबरपासून NIFTY 50 इंडेक्समध्ये समाविष्ट केले जाईल. त्याच दिवशी HUL साठी स्पेशल प्री-ओपन सेशन घेण्यात येणार आहे.
HUL ने सांगितले की आइसक्रीम व्यवसायाचे स्वतंत्र लिस्टेड युनिटमध्ये रूपांतर केल्याने ‘क्वालिटी वॉल्स’, ‘कॉर्नेटो’, ‘मॅग्नम’ यांसारख्या ब्रँड्सची क्षमता अधिक वेगाने वाढेल.
30 ऑक्टोबर रोजी NCLT ने या विभाजनास मंजुरी दिल्याने डीमर्जरची प्रक्रिया सुरू झाली आहे. सेबीच्या नियमांनुसार डीमर्जरला मंजुरी मिळाल्यानंतर 60 दिवसांच्या आत नव्या कंपनीचे शेअर्स लिस्ट करणे अनिवार्य आहे.
#HUL #QualityWalls #ShareMarketNews #BusinessMarathi #BreakingNews







