
पुणे : नवले पुलावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी आता पुणे पोलिसांसोबत ब्लूमबर्ग फिलांथ्रोपीस आणि ग्लोबल रोड सेफ्टी पार्टनरशिप काम करणार आहे. या संस्थांच्या अधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांची भेट घेतली.
न्यूझीलंड आणि यूनाइटेड किंगडमच्या पोलीस विभागात काम केलेले ब्लूमबर्ग फिलांथ्रोपीसचे सिनियर रोड पोलिसिंग ॲडव्हायझर पॉल सिमकॉक्स, ग्लोबल रोड सेफ्टी पार्टनरशिपच्या इनिशिएटिव समन्वयक एम. कांचन आवटे, एनफोर्समेंट समन्वयक राजेंद्रकुमार शेडे व सर्वेलेंस समन्वयक डॉ. नितीन गुजराथी यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांची भेट घेऊन संवाद साधला. वाहतूक सुधारणा, अपघात प्रतिबंध, रोड सेफ्टी यावर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
यावेळी त्यांनी नवले पुलावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी करता येणाऱ्या उपाययोजना सुचवल्या. पुण्यातील नवले पुलावर वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आता पुणे पोलिसांसोबत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ संस्था काम करणार आहेत. त्यामुळे याविषयी दीर्घकालीन उपाययोजना होण्याची आशा निर्माण झाली आहे.
पुण्यात गेल्या काही महिन्यांत नवले पुलावरील अपघातांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
#PuneNews #RoadSafety #NavaleBridge #PunePolice #TrafficUpdate







