
फायटर कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळणारे जेरबंद
वानवडी पोलिसांनी कोंबड्यांना क्रुरपणे वागणार्या ६ जणांना केली अटक
पुणे : फायटर कोंबड्यांची झुंज लावून त्यावर पैसे लावून जुगार खेळणार्या ६ जणांना वानवडी पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
वानवडी पोलिसांनी कोंबड्यांना क्रुरपणे वागणार्या ६ जणांना केली अटक
पुणे : फायटर कोंबड्यांची झुंज लावून त्यावर पैसे लावून जुगार खेळणार्या ६ जणांना वानवडी पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
अमोल सदाशिव खुर्द ( वय ४७, रा. रविवार पेठ), मंगेश अप्पा चव्हाण ( वय ५५, रा. भवानी पेठ), निखिल मनीष त्रिभुवन ( वय २०, रा. घोरपडी), अमीर अयुब खान (वय २८, रा . घोरपडी गाव), सचिन सदाशिव कांबळे ( वय ४२, रा. भवानी पेठ), प्रणेश गणेश पारम ( वय २७, रा. कॅम्प) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार हे रविवारी गस्त घालत असताना पोलीस अंमलदार गोपाळ मदने आणि अमोल पिलाने यांना बातमी मिळाली की, इंप्रेस गार्डनच्या पाठीमागे मोकळ्या मैदानात ५ ते ६ जण पैशांवर कोंबड्यांची झुंज लावून त्यावर जुगार खेळत आहेत. तपास पथकाचे पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी तेथे जाऊन कोंबड्यावर पैसे लावून हार जीत खेळत असताना ६ जणांना पकडले.
त्यांच्याकडून ६ रंगीबिरंगी कोंबडे, त्यांची ने आण करण्यासाठी च्या तांगूसच्या ६ पिशव्या, ३ मोटारसायकली, ५ मोबाईल, २५८० रुपये असा एकूण ५ लाख ११हजार ८८० रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाने, गोपाळ मदने, बालाजी वाघमारे, विष्णू सुतार, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमले, हर्षद सय्यद, सुजाता फुलसुंदर यांनी केली आहे.