एटीएसची कोंढव्यात पुन्हा मोठी कारवाई
दहशतवादी कृत्यांशी संबंधातून १९ ठिकाणी छापेमारी, रात्रभर सुरु होते छापासत्र
पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात पुणे पोलीस आणि राज्य दहशतवादी पथक (एटीएस)ने अनेक ठिकाणी एकाचवेळी छापेमारी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. एटीएसने कोंढवा व इतर अशा १९ ठिकाणी हे सर्च ऑपरेशन राबविले आहे. दहशतवाद्यांशी संबंधित ही छापेमारी असल्याचे सांगण्यात आले आहे.
यापूर्वी कारवाई झालेल्या अशोका म्युज या मोठ्या सोसायटीबाहेर मोठ्या प्रमाणावर मध्यरात्रीपासून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एटीएसने काही संशयित दहशतवाद्यांच्या शोधासाठी ही मोहिम हाती घेतल्याचे सांगितले जाते. या कारवाईमुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे.
राज्य एटीएस पथक व पुणे पोलिसांची ही संयुक्त कारवाई अतिशय गुप्तपणे करण्यात आली. त्यात स्थानिक युनिट व स्थानिक पोलीस ठाण्याच्या मदतीशिवाय ही कारवाई केली गेली. पुणे पोलिसांनी या कारवाईसाठी पोलीस मुख्यालयातील बंदोबस्त तैनात केला होता.
दोन वर्षांपूर्वी कोंढवा परिसरातून बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या तिघा जणांना पकडण्यात आले होते. त्यातून मोठा दहशतवादी कट उधळण्यात आला होता. या देशव्यापी कटात राजस्थान, गुजरात येथून काही दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. सध्या त्यांचा तपास एनआयए करत आहे. त्यानंतर आता कोंढव्यात पुन्हा एटीएसची कारवाई सुरु झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.