
पोलीस हवालदार अमोल काटकर यांना मारहाण करणारे तिघे जेरबंद
गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाची कामगिरी, लॉ कॉलेज येथील मध्यरात्रीची घटना
पुणे : मध्यरात्री कामावरुन घरी जात असताना खड्डा चुकविताना गाडीला धक्का लागल्यावर पोलीस हवालदार अमोल काटकर यांना त्यांच्याकडील काठीने मारहाण करुन गंभीर जखमी करणार्या तिघा आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने अटक केली आहे.
निखिल प्रविण जगताप (वय २७), सनी संजय खोमणे (वय ३०, रा. म्हसोबा मंदिराजवळ, दत्तवाडी) प्रथमेश ज्ञानेश्वर जाधव (वय २५, रा. दत्तवाडी) अशी या तिघांची नावे आहेत.
पोलीस हवालदार अमोल काटकर (वय ४३, रा. शिवाजीनगर पोलीस वसाहत) हे गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकात कार्यरत आहेत. ते वारजे येथील युनिट ३च्या कार्यालयातून रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता निघाले होते. लॉ कॉलेज येथे खड्डा चुकविताना त्यांचा शेजारुन जाणार्या गाडीला धक्का लागून त्यावरील तरुण खाली पडला. काटकर हे गाडी थांबवून त्यांना उचलण्यासाठी गेले. त्याचवेळी दुसर्या दुचाकी दोघे आले. त्यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. काटकर यांनी आपण पोलीस असल्याचे सांगून खड्डा चुकविताना चुकून धक्का लागल्याचे सांगितले. गाडीला लावलेली काठी काढून दाखवली. आरोपींन त्याच काठीने, हाताने व लाथाबुक्क्यांनी अमोल काटकर यांच्या कानावर, कपाळावर, पाठीवर मारहाण गंभीर जखमी केले.
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार अमित बोडरे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, काटकर यांना मारहाण करणारे आरोपी दत्तवाडी येथे रहायला असून आता घरीच आहेत. त्या माहितीनुसार पोलिसांनी त्यांना दत्तवाडीतील म्हसोबा चौक परिसरातील घरातून ताब्यात घेतले. पुढील कारवाई साठी त्यांना डेक्कन पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे, अमित बोडरे, चेतन शिरोळकर, तुषार शिंदे यांनी केली आहे.