बोगस महिला आयपीएस अधिकारी मुलीसह जेरबंद
बनावट आयपीएस ओळखपत्र दाखवून केली होती चप्पल, ज्वेलरीची खरेदी
पुणे : आयपीएस अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवून चप्पल, बुट खरेदी करुन दुकानातील कामगाराला पोलीस कमिशनर ऑफिसला आणून गेटवर थांबविले. फसवुन पसार झालेल्या माय लेकींना लष्कर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
मिनाज मुर्तजा शेख (वय ४०) आणि त्यांची मुलगी रिबा मुर्तजा शेख (वय १९, रा. बुर्ज अल मर्जाना सोसायटी, कोंढवा) अशी या मायलेकींची नावे आहेत.
याबाबत आझम इकराब शेख (रा. भवानी पेठ) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे एम जी रोडवर कलीज हे चप्पलचे दुकान आहे. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी मिनाज शेख व त्यांची मुलगी रिबा शेख या दुकानात आल्या. मिनाज शेख हिने आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून बनावट ओळखपत्र दाखविले. घरात लग्नाचा कार्यक्रम असल्याचे सांगून मोठ्या प्रमाणावर चप्पल व बुट खरेदी केले. त्याचे पैसे देण्यासाठी कामगाराला पोलीस आयुक्तालयात चल असे सांगितले. कामगाराला आयुक्तालयाच्या गेटवरच थांबवून त्या दोघी माल घेऊन पसार झाल्या.
या गुन्ह्यात तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती भराड व तपास पथकातील पोलीस अंमलदार लोकेश कदम आणि अमोल कोडीलकर यांनी एम जी रोड, कॅम्प परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्यातून या दोघी निष्पन्न झाल्या. दोघींना पोलिसांनी अटक केली. त्यांनी कलीज दुकानातून तसेच मचमोर या दुकानातून चोरलेल्या काही इमिटेशन ज्वेलरी व चप्पल बुट असा ४५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
मिनाज शेख व तिची मुलगी रिबा शेख यांच्या विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात २०१८, २०२० आणि २०२३ मध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त संगिता अल्फानसो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वाती भराड, पोलीस हवालदार सचिन खोलासे, महेश कदम, पोलीस अंमलदार लोकेश कदम, सागर हराळ, अमोल कोडिलकर, महिला अंमलदार आखाडे, बनसुडे, औटी यांनी केली आहे.