
बॉम्बस्फोट नाही हे तर पोलिसांचे मॉक ड्रिल
दहशतवादी हल्ल्याचा पोलिसांचा डेक्कन व एम जी रोडवर सराव
पुणे : भर दुपारी २ ची वेळ डेक्कन जिमखाना परिसरातील रोड वाहतूकीला बंद केले गेले. त्याचवेळी अचानक मेट्रोच्या नवीन पादचारी पुलाजवळ एकच स्फोट होतो. या स्फोटाच्या आवाजाने परिसर हदरुन जातो. गरवारे पुलाची दुरुस्ती असताना हा स्फोट कसला अशा शंका आजूबाजूच्या लोकांच्या मनात येतात. परंतु, कालांतराने जाहीर केले जाते की, हा स्फोट अथवा दुरुस्ती काही नसून हे पोलिसांचे मॉक ड्रिल आहे. परंतु, या मॉल ड्रिक व दुरुस्तीची सरमिरळ केल्याने लोकांचा एकच गोंधळ उडाला होता. अनेक जण वाहतूक कोंडीत अडकून पडले. त्याचवेळी या मॉक ड्रिलकडे जाणारी एक अग्निशमन दलाचा बंब सह्याद्री हॉस्पिटल ते खंडोजीबाबा चौक दरम्यान १० मिनिटे वाहतूक कोंडीत अडकला होता. वाहतूक शाखेने गरवारे पुलाची दुरुस्ती असल्याचे तसेच कॅम्पातील एम जी रोडवर दुरुस्ती असल्याने या भागातील वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार, पोलिसांनी दुपारी १ वाजल्याच्या सुमारास या परिसरातील वाहतूक बंद केली. त्यानंतर काही वेळाने डेक्कन येथील मेट्रोच्या नवीन पादचारी पुलाजवळ दुपारी २ वाजता पहिला स्फोट झाला़ त्याचा आवाज दुरवर ऐकायला गेला. त्याचवेळी रस्ते अडविले गेले असल्याने गर्दीतील लोकांना वाटले की, गरवारे पुलाच पडला. दुरुस्ती करताना पुलच पाडला का अशा अनेक शंकाकु शंका लोकांना येऊ लागल्या. या स्फोटा पाठोपाठ दोन कमांडो हातात स्टेनगन घेऊन सावध पवित्र्यात रस्ता पार करुन जाताना दिसत होते. त्यानंतर आणखी दोन जवान गेले. हे पाहून परिसरातील लोकांना पुलाची दुरुस्ती नाही तर हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे, असे वाटले. काही लोकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन स्फोट झाल्याचे कळविले. तेव्हा तेथील पोलीस अधिकार्यांनी मॉक ड्रिल सुरु असल्याचे सांगितले. डेक्कन परिसरातील रोड बंद केल्याने कर्वे रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. त्यात नळस्टॉप येथील केंद्रावरुन निघालेली अग्निशमक दलाची गाडी या वाहतूक कोंडीत अडकून पडली. त्यामुळे ती या मॉक ड्रिलच्या ठिकाणी जवळपास १० मिनिटांनी उशिरा पोहचली. याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले की, डेक्कन व कॅम्पमधील एमजी रोडवर ब्लास्ट झाला. हा ब्लास्ट डमी होता. पोलिसांचे ते एक्सरसाईज ड्रिल आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्कालीन स्थिती ओढावल्यास तर काय करावयाचे या साठी केलेले हे एक मॉक ड्रिल आहे. या रस्त्यांवर वाहनांची गर्दी होऊन त्याला लोकांना त्रास होऊ नये, म्हणून गरवारे पुल व एम जी रोडवर दुरुस्ती असल्याचे सांगण्यात आले होते, असे डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी सागिंतले.