खिडकीवाटे चोरी करणारा चोरटा जेरबंद
काळेपडळ पोलिसांची कामगिरी, मोबाईलवर बोलताना सीसीटीव्हीमध्ये झाला होता कैद
पुणे : खिडकीवाटे घरात शिरुन दीड लाख रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने चोरुन नेणारा चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोबाईलवर बोलताना आढळून आला होता. यावरुन काळेपडळ पोलिसांनी कोंढव्यातून घरफोडी करणार्या चोरट्यास पकडले.
मुस्तफा शकील अन्सारी (वय ४१, रा. जवाहरगंज, कोंढवा) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने, गुन्हा करताना वापरलेली दुचाकी व मोबाईल असा ९ लाख २२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
याबाबत काळुराम अर्र्जुन आबनावे (वय ५८, रा. बंका सफायर, जगदंबा भवन मार्ग, पिसोळी) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २२ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान ही घरफोडी झाली. फिर्यादी दुपारी साडेचार वाजता घर बंद करुन शेतावर गेले होते. तेथून सायंकाळी साडेसात वाजता परत आले. या दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या मागील बाजूचे खिडकीवाटे आत प्रवेश करुन बेडरुममधील कपाटातील १ लाख ४३ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरुन नेले होते.
तपास पथकातील पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, नितीन ढोले व महादेव शिंदे यांनी भेट दिली. चोरी करणार्या चोरट्याचा शोध घेत असताना बंका सफायर सोसायटी, आंबिका हॉटेल रोड, पिसोळी, उंड्री, कात्रज कोंढवा रोड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेची पडताळणी केली. या सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने व घटनास्थळी मिळून आलेल्या फुटेजमध्ये आरोपी हा त्याच्या मोबाईलवरुन बोलत असल्याचे दिसून आले. त्यावेळी तेथे असलेल्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करुन हा आरोपी कोंढवा येथे असल्याचे समजले. त्यावरुन मुस्तफा अन्सारी याला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा कबुल केला़ त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने, दुचाकी, मोबाईल असा ९ लाख २२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे यांनी केली आहे.