
आयटी कंपनीतील तरुणी टेलिग्राम टास्कची बनली शिकार
पार्टटाईम जॉबच्या नावाखाली तरुणीची सायबर चोरट्यांनी घातला ५ लाखांना गंडा
पुणे : आयटी कंपनीत नोकरी करणार्या तरुणीला पार्टटाईम जॉबच्या नावाखाली टास्क पूर्ण करायला लावून ५ लाख २८ लाख रुपयांना सायबर चोरट्यांनी गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत बाणेरमध्ये राहणार्या २६ वर्षाच्या तरुणीने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १६ ते १९ सप्टेंबर २०२५ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही आयटी कंपनीत नोकरी करत असून एकटीच राहते. ती घरी असताना १५ सप्टेंबर रोजी तिला व्हॉटसअॅपच्या एका ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले. त्यात रिमोट पार्टटाईम जॉब ऑफरचा मेसेज होता. घरीबसल्या तुम्ही २ ते ३ हजार रुपये कमावू शकता, असे मेसेज आला. सुरुवातीना टास्क पूर्ण केल्यावर किरकोळ पैसे देण्यात आले. त्यांचा विश्वास बसल्यावर त्यांना लिंक पाठवून टास्क पूर्ण करण्यासाठी पैसे भरायला लावले. अशा प्रकारे त्यांनी १६ ते १९ सप्टेंबर दरम्यान ५ लाख २८ हजार रुपये पाठविले. त्यांच्या टेलिग्राम साईटवर ७ लाख १४ हजार ५०० रुपये दाखवत होते. ते काढण्यासाठी त्यांना १ लाख रुपये भरण्यास सांगितले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत तपास करीत आहेत.




