तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा गुन्हेगार जेरबंद
रिक्षाचालकाच्या खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला छत्रपती संभाजीनगरमधूून केली अटक
पुणे : त्यांच्या त्रासाला कंटाळून रिक्षाचालकाने आपले घर बदलले़ रिक्षाभाडे घेऊन हडपसर येथील शिंदे वस्तीत गेले होते. त्यावेळी रिक्षातील टेपचा आवाज कमी न केल्याने कारण करुन टोळक्याने हत्याराने रिक्षाचालकाच्या खुनाचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून गेली ३ महिने पोलिसांना गुंगारा देणार्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला वानवडी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर येथून जेरबंद केले आहे.
ऋषिकेश सुनील बागुल (वय २७, रा. एस आर ए, बिल्डिंग, शिंदेवस्ती, हडपसर) असे या गुंडाचे नाव आहे. ऋषिकेश बागुल याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ४, फरासखाना, हडपसर आणि खडक पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण ७ गुन्हे दाखल आहेत.
याबाबत काकासाहेब रामचंद्र शिरोळे (वय ४६, रा. कसबा पेठ) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंदे व गुंड ऋषिकेश बागुल हे शिवाजीनगर येथील राजीव गांधीनगर झोपडपट्टीत रहात होते. मेट्रोच्या कामासाठी त्यांची वसाहत तेथून उठविण्यात आली. त्यांचे हडपसरमधील शिंदेवस्ती येथील एस आर ए बिल्डिंगमध्ये पुर्नवसन केले. ऋषिकेश बागुल हा त्यांच्याकडे स्कुटरची मागणी करत असे. त्याच्या टोळक्याने त्यांना मारहाणही केली होती. गुंडगिरी करणार्या ऋषिकेश बागुलच्या त्रासाला कंटाळून ते तेथून कसबा पेठेत रहायला गेले होते. ४ जुलै रोजी ते शिंदे वस्तीतील एसआरए बिल्डिंगमध्ये नातेवाईकांना घेऊन गेले होते. बिल्डिंगच्या खाली ते रिक्षात टेप लावून थांबले होते. त्यावेळी दादा क्षीरसागर तेथे आला. त्याने टेप बंद करायला सांगितले. तेव्हा त्यांनी टेप बारीकच असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी तू मला शिकवणार का असे म्हणून शिवीगाळ करु लागला. त्यानंतर ऋषिकेश बागुल याने त्याच्या हातातील हत्याराने त्यांच्या डोक्यात मारले. इतरांनी लाकडी दांडक्याने, फरशीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा ऋषिकेश बागुल व त्याच्या १० साथीदारांवर दाखल केला होता. तेव्हापासून ऋषिकेश फरार होता.
तपास पथकातील पोलीस अंमलदार यतीन भोसले, गोपाळ मदने व अमोल गायकवाड यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, फरार ऋषिकेश बागुल हा छत्रपती संभाजीनगर येथे रहात आहे. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व त्यांचे सहकारी छत्रपती संभाजीनगर येथे गेले. तेथे शोध घेत असताना ऋषिकेश बागुल हा वैजापूर बस डेपो येथे दिसून आला. पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या सुचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, यतीन भोसले, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे, अभिजित चव्हाण, विठ्ठल चोरमले व अर्शद सय्यद यांनी केली आहे.