
पोलिसांनी केला गुन्हा दाखल
पुणे : रस्त्यावर अपघात घडल्यानंतर मृतदेह पोलिसांना उचलू न देता रस्ता अडवून धरीत आंदोलन करून पुणे नगर रस्ता रोखून धरण्यात आल्याचा प्रकार खराडी येथील दर्गा चौकात घडला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश सत्यवान चौधरी असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दौलत राजाराम चौधरी (वय ३२, रा. गणपती मंदिराचे मागे, खराडी गाव), राजाराम चौधरी, राजाराम चौधरी यांची पत्नी, स्वप्निल जाधव, शुभम परदेशी, सौरभ चौधरी, अभिषेक चौधरी, सोन्या चौधरी, निलेश घाडगे, युवराज कांबळे, स्वप्निल कांबळे, कार्तिक खराडे, मोहन शिंदे, राजगुरु यांच्यासह अंदाजे १०० अशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता १८९(२), १८९ (३), १८९(५), १९०, २२३, २२१, ३२४ (४), ३०१, महाराष्ट्र पोलीस कायदा ३ (९) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विजय बाळा अनार्थे यांनी फिर्याद दिली आहे.
नगर रस्त्यावर एक अपघात झाला होता. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जवळपास १०० व्यक्ती घटनास्थळावरील जमा झाले. मृतदेह पोलिसांना उचलण्यास मज्जाव करण्यात आला. पोलिसांनी त्यांनी महामार्गावरील वाहतूक थांबवू नये आदेश संबंधितांना दिले. तसेच, बेकायदेशीर जमाव पांगवण्याचा आदेश दिला. मात्र, बेकायदेशीर जमाव जमवीत सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना त्यांचे सार्वजनिक कार्य पार पाडण्यास अटकाव केला. योगेश सत्यवान चौधरी यांचे शव रस्त्यावर ठेवत शवाची अप्रतिष्ठा केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.




