
किंमत 6.79 लाखांपासून सुरू
मारुती सुझुकीने बहुप्रतीक्षित चौथ्या पिढीची डिजायर सेडान भारतात लाँच केली आहे. या नव्या 2024 डिजायरची प्रारंभिक किंमत 6.79 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर टॉप वेरिएंडची किंमत 10.14 लाख रुपये आहे. याशिवाय, कंपनीने 8.74 लाख रुपयांपासून सुरू होणारे दोन सीएनजी व्हेरिएंट्सदेखील लाँच केले आहेत. नवीन डिजायरमध्ये संपूर्णपणे नवीन स्टाइलिंग, डिझाइन, आधुनिक फीचर्स आणि अद्ययावत इंजिन दिले आहे. या मॉडेलचे मुख्य स्पर्धक होंडा अमेझ आणि हुंडई ऑरा असतील. डिजायर हा भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकला जाणारा मॉडेल आहे.
5-स्टार सुरक्षा रेटिंग
2008 मध्ये पहिल्यांदा स्विफ्ट डिजायर या नावाने लाँच झालेली ही गाडी आता चौथ्या पिढीत आल्याने यात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. नवीन 2024 डिजायरने ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळवली आहे, ज्यामुळे मारुतीचे हे पहिले मॉडेल 5-स्टार रेटिंगसह सुसज्ज झाले आहे.
लुक आणि डिझाइन
2024 डिजायरच्या लुकमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. नवीन ग्रिल, स्लीक एलईडी हेडलॅम्प्स, अपडेटेड बंपर, आणि क्रोम स्ट्रिपसह अधिक आकर्षक फ्रंट लुक दिला आहे. मागील बाजूला नवीन डिझाइनचे बंपर, एलईडी टेल लाइट्स, क्रोम स्ट्रिप आणि शार्क-फिन अँटेना हे नवीन फीचर्स जोडले गेले आहेत. 15-इंच अलॉय व्हील्सचे नवीन डिझाइन देखील दिले आहे.
नवीन इन्टिरियर फीचर्स
आतूनही डिजायरचे इन्टिरियर अधिक आकर्षक करण्यात आले आहे. ड्युअल-टोन ब्लॅक आणि बेज थीम, नवीन डॅशबोर्ड, 9-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, लेदर अपहोल्स्ट्रीसह येतो. पहिल्यांदाच यामध्ये सनरूफ, क्रूझ कंट्रोल, रिअर एसी वेंट, 360-डिग्री कॅमेरा आणि रिअर चार्जिंग पोर्ट्स यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
इंजिन आणि मायलेज
2024 डिजायरमध्ये Z-सीरीजचे 1.2-लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे 82 bhp पॉवर आणि 112 Nm टॉर्क देते. हे 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. सीएनजी पर्याय VXi आणि ZXi व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. मॅन्युअल गिअरबॉक्ससह 24.79 kmpl आणि AMT सह 25.71 kmpl पर्यंतचा मायलेज दावा केला आहे.
नवीन मारुति सुजुकी डिजायर आता अधिक सुरक्षित, आकर्षक आणि अत्याधुनिक फीचर्ससह बाजारात उपलब्ध आहे.