पतीच्या त्रासाने ४ महिन्याच्या गर्भवतीने उचलले टोकाचे पाऊल
मुलगाच पाहिजे यासाठी होणार्या छळामुळे पिले विषारी औषध, धनकवडीतील घटना
पुणे : मुलगाच पाहिजे, मुलगी झाली तर नांदविणार नाही, अशा पतीची धमकी़ त्यामुळे होणारा मानसिक व शारीरीक छळ यामुळे एका विवाहितेने ४ महिन्यांची गर्भवती असताना टोकाचे पाऊल उचलले़ उपचार सुरु असताना तिचा मृत्यु झाला. सहकारनगर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ऋतुजा सागर चुंबळकर (वय २६, रा. हेरंब अपार्टमेंट, बालाजीनगर) असे या विवाहितेचे नाव आहे.
याबाबत गणेश पेठेत राहणार्या तिच्या वडिलांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना बालाजीनगर येथील हेरंब अपार्टमेंट येथे २७ सप्टेंबर रोजी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी ऋतुजा ही बँकेत काम करत होती. तिचा जानेवारी २०२४ मध्ये बारामती तालुक्यातील सागर चुंबळकर याच्याशी विवाह झाला. सागर चुंबळकर एका फायनान्स बँकेत कामाला आहे. ते बालाजीनगर येथील हेरंब अपार्टमेंटमध्ये रहात होते. ऋतुजा गरोदर आहे, हे जुलै २०२५ रोजी लक्षात आले. तेव्हा सागर याने तिला मुलगाच झाला पाहिजे, असे म्हणून धमकाविण्यास सुरुवात केली. मुलगा व्हावा, यासाठी तिच्यावर वेगवेगळे उपचार करण्यास सुरुवात केली. त्याच्या या मुलगा पाहिजे, हट्टापायी तिला मानसिक व शारीरीक त्रास देऊ लागला. त्यातून मानसिक तणावात जाऊन ऋतुजा तिने ४ महिन्यांची गर्भवती असताना विषारी औषध प्राशन केले. तिच्यावर उपचार चालू असताना २७ सप्टेंबर रोजी तिचे निधन झाले. पोलिसांनी सागर चंबुळकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करीत आहेत.