January 15, 2026

Month: December 2025

निवडणुकीच्या कामासाठी वैकुंठ स्मशानभूमीतील बंद ठेवण्यात आलेले पास केंद्र सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, या...
अमृत मंडलच्या निर्घृण हत्येने अल्पसंख्यांक हिंदूंच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह ढाका/राजबारी : बांग्लादेशमध्ये हिंदू अल्पसंख्यांकांविरोधातील हिंसाचार पुन्हा एकदा...
2026 निंजा 650 च्या डिझाइनमध्ये मोठे बदल नसले तरी नवीन लिव्हरी (ग्राफिक्स) मुळे बाईकला ताजा लुक मिळाला...
कोहिनूर कट्टा प्रस्तुत ‘दशावतार नाबाद १००’ कार्यक्रमाअंतर्गत कलाकारांचा सत्कार, गप्पा पुणे : दशावतार चित्रपटाची संकल्पना माझ्या मनाला भावली. दशावतार कला प्रकाराविषयी मी ऐकून होतो; परंतु प्रत्यक्षात मी हा कलाप्रकार कधीही पाहिला नव्हता. त्यामुळे चित्रपटातील बाबुली मेस्त्री ही भूमिका साकारताना आव्हाने घेता येतील याचा वास मला लागला. या भूमिकेत काही तरी करण्यासारखे आहे, असे जाणवल्याने मी ही भूमिका स्वीकारली, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केल्या. कोकणातील परंपरा, वारसा, संस्कृती, पर्यावरण रक्षण यावर भाष्य करणारा २०२५ मधील बहुचर्चित चित्रपट ‘दशावतार’ शंभर दिवसांचा नाबाद प्रवास पूर्ण करीत आहे. त्या निमित्त कोहिनूर कट्टा प्रस्तुत ‘दशावतार १००’ या कार्यक्रमाअंतर्गत चित्रपटातील कलाकारांशी संवाद आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा आज (दि. २४) आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी दिलीप प्रभावळकर बोलत होते. कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे कार्यकारी संचालक प्रकाश मगदूम, लागू बंधूंचे सारंग लागू तसेच संयोजक वीरेंद्र चित्राव यांची विशेष उपस्थिती होती. कोहिनूर ग्रुप, एनएफडीसी आणि लागू बंधू यांच्या सहकार्याने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दृक्‌श्राव्य कार्यक्रमात दिलीप प्रभावळकर यांच्यासह...