
एनटीपी २०२५ : नवीन दूरसंचार धोरणाचा मसुदा जाहीर
नवी दिल्ली: दूरसंचार विभागाने ‘नॅशनल टेलिकॉम पॉलिसी २०२५ (NTP 2025) चा मसुदा गुरुवारी जाहीर केला आहे. या धोरणात २०३० पर्यंत थेट व अप्रत्यक्षरित्या १० लाख नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचे आणि प्रत्येक वर्षी या क्षेत्रात १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
या धोरणाचा उद्देश 5G, 6G, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, क्वांटम कम्युनिकेशन, सॅटेलाइट नेटवर्क आणि ब्लॉकचेन यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानांच्या संशोधन आणि नवप्रवर्तनात भारताला जगातील आघाडीच्या १० देशांमध्ये स्थान मिळवून देणे आहे. या धोरणात ‘सार्वत्रिक कनेक्टिव्हिटी’ म्हणजे सर्वांपर्यंत इंटरनेट पोहोचवणे, तसेच देशाच्या दरडोई उत्पन्नामध्ये दूरसंचार क्षेत्राचा वाटा दुप्पट करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
NTP 2025 चे 6 धोरणात्मक मिशन नेमकेपणाने ठरवण्यात आलेले आहे. सार्वत्रिक कनेक्टिव्हिटी, नवप्रवर्तनाला चालना देणे, घरेलू उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) वाढवणे, सुरक्षित आणि विश्वासार्ह नेटवर्क विकसित करणे, Ease of Living आणि Ease of Doing Business सुधारणा, शाश्वत विकासाचा आग्रह याचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. धोरणात नमूद केल्याप्रमाणे, भारताला जागतिक दूरसंचार उत्पादक आणि निर्यातदार देश बनवण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी संशोधन, कुशल मनुष्यबळ निर्मिती आणि पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणावर मोठा भर दिला जाणार आहे.
यासोबतच निर्यात व संशोधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. या धोरणाअंतर्गत, दूरसंचार उत्पादने आणि सेवा यांची निर्यात दुप्पट केली जाणार असून स्टार्टअप्स आणि R\&D साठी गुंतवणूक वाढवली जाणार आहे. २०३० पर्यंत 6G क्षेत्रात १० टक्के जागतिक बौद्धिक संपदा हक्क (IPR) मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या उद्दिष्टांसाठी नॉन-प्रॉफिट इनोवेशन कंपनी स्थापन केली जाणार आहे. तसेच, आयआयटी आणि ३० उच्च तंत्रज्ञान प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत.
धोरणात सॉव्हरिन पेटंट फंड तयार केला जाणार आहे, जो आवश्यक टेलिकॉम तंत्रज्ञानांसाठी Standard Essential Patents Pool विकसित करेल. याशिवाय ३० उच्च दर्जाच्या प्रयोगशाळा देशभरात उभारल्या जातील. IIT नावाचा नवीन भारतीय टेलिकॉम टेक्नॉलॉजी संस्थान स्थापन केला जाईल. विद्यार्थ्यांना उद्योगासाठी तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. अत्याधुनिक संशोधनाला प्रोत्साहन दिले जाईल असेही नमूद करण्यात आले आहे.