पुणे : उद्योजकांमध्ये परस्पर सहकार्य वाढावे यासाठी कोविड काळात स्थापन झालेल्या स्नो या संस्थेच्या स्नो पँथर्स पीसीएमसी चॅप्टरचा प्रथम वर्धापन दिन संपन्न झाला.
द फर्न भोसरी येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी स्नो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपक तोष्णीवाल. पीसीएमसी चॅप्टरचे अध्यक्ष नवीन पाटणकर,उपाध्यक्ष ललित बडगुजर,खजिनदार सुमित गोकर्ण आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील उद्योजक उपस्थित होते. या कार्यक्रमात उत्तम कार्य करणाऱ्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलतांना डॉ.दीपक तोष्णीवाल यांनी सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या काळात तंत्रज्ञान ही वेगाने बदलत आहे.सर्व काही एकाच उद्योजकाला सर्व माहिती ठेवणे कठीण आहे,मात्र अनेक उद्योजक एकत्र असल्यास माहितीची देवाणघेवाण सोपी होते, यासाठी उद्योजकाने सतत नवे उद्योजक संपर्क केला पाहिजे असे सांगितले.





